शेतातून आले, हातपाय धुवून बसत नाही तोच पुतण्या धावत आला, काका काका…. शेतात काय झालं बघा…; नांदुरा तालुक्‍यातही विकृताचा कारनामा

नांदुरा ( प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील सूड्या जाळण्याचे सत्र गेल्या काही दिवसांत कमी झाले होते. मात्र नांदुरा तालुक्यात पुन्हा एकदा तशीच विकृती समोर आली आहे. सांगवा येथील शेतकऱ्याची हरभरा सुडी आणि ठिबळ नळ्या जाळून 95 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. ही घटना 6 मार्चच्या रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी आज …
 

नांदुरा ( प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील सूड्या जाळण्याचे सत्र गेल्या काही दिवसांत कमी झाले होते. मात्र नांदुरा तालुक्‍यात पुन्‍हा एकदा तशीच विकृती समोर आली आहे. सांगवा येथील शेतकऱ्याची हरभरा सुडी आणि ठिबळ नळ्या जाळून 95 हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. ही घटना 6 मार्चच्‍या रात्री आठच्‍या सुमारास घडली. या प्रकरणी आज पोलिसांनी अज्ञात व्‍यक्‍तीविरुद्ध गुन्‍हा नोंदवला आहे.

सांगवा येथील मोहन भिकाजी तिडके (39) यांच्या शेतातील हरभरा सूडी व ठिबक नळ्या कुणीतरी जाळल्‍या. त्‍यांची सांगवा शिवारात एकूण सहा एकर शेती आहे. त्यांनी 3 एकर कपाशी व 2 एकर हरभरा व 1 एकर गहू लावला असून, हरभऱ्याची सूडी व ठिबक नळ्या बंडल 100 ते 150 फुटांवर ठेवल्या होत्या. 6 मार्च रोजी शेतातून सायंकाळी पाचला ते घरी परतले. घरी बसलो असताना पुतण्याने  त्‍यांना शेतात जाळ दिसल्‍याचे सांगितले. तसेच तिडके आणि कुटुंबीय तिकडे पळत सुटले. मात्र ते  जाईपर्यंत हरभरा सूडी व ठिबक नळ्या जळून खाक झाल्या होत्या. दोन एकरातील अंदाजे अकरा क्‍विंटल हरबरा (किंमत 55,000 रुपये) व ठिबक नळ्या बंडल (45,000 रुपये) असा एकूण 95,000 रुपयांचा माल जळाला आहे. गावातील शेतकरी भीती पोटी रात्रभर शेतातच थांबले होते.