शेतातून शेडनेट चोरताना एकाला शेतकऱ्यांनी पकडले!; चिखलीतील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतातील शेडनेट पाईप चोरून नेताना चौघांना शेतकऱ्यांनी पाहिले. त्यांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. पण तीन चोर पळून गेले, एक हाती सापडला… त्याला पकडून ठेवत मग शेतमालकाला बोलाविण्यात आले. या चोरट्याला चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही घटना 5 जूनच्या रात्री साडेनऊच्या सुमारास चिखली शहराजवळ भाग १ येथे घडली. या …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतातील शेडनेट पाईप चोरून नेताना चौघांना शेतकऱ्यांनी पाहिले. त्‍यांनी त्‍यांच्‍या दिशेने धाव घेतली. पण तीन चोर पळून गेले, एक हाती सापडला… त्‍याला पकडून ठेवत मग शेतमालकाला बोलाविण्यात आले. या चोरट्याला चिखली पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्यात आले आहे. ही घटना 5 जूनच्‍या रात्री साडेनऊच्‍या सुमारास चिखली शहराजवळ भाग १ येथे घडली.

या प्रकरणी डॉ. दत्ता गणपत भराड यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्‍यांची बुलडाणा बायपास रोडवर प्रथमेश ट्रेडर्सच्या शेजारी चिखली भाग 1 मध्ये शेती आहे. 5 जूनला ते रात्री साडेनऊला बेराळा येथे एकनाथराव पाटील यांच्‍या घरी जेवणास गेले असता त्‍यांच्‍या मोबाइलवर शेता शेजारील शेतकरी अनिल जैवाळ यांचा फोन आला. त्यांनी माहिती दिली की, तुमच्या शेतातील शेडनेटचे लोखंडी पाइप नेताना आम्ही चोर पकडला आहे. डॉ. भराड यांनी तातडीने शेताकडे धाव घेतली. मदन भराड यांच्‍यासह सवणा रोडवरील शेतात पोहोचले असता तेथे अनिल जैवाळ व नीलेश नंदकिशोर खरात हजर होते.

त्यांनी गणेश सुखदेवराव शिंदे (52, रा. गांधीनगर चिखली) याला पकडून ठेवले होते. त्‍याचे साथीदार तिसरा अनिल मोरे (रा. मालगणी ह. मु. गवळीपुरा चिखली) व रोहिदासनगर चिखली व गोरक्षणवाडी चिखली येथील आणखी दोघे पळून गेले होते. 4 हजार रुपयांचे पाइप चोरून घेऊन जाताना त्यांना पाहिले गेल्याने त्यांनी पाईप थोड्या अंतरावर नेऊन तेथेच टाकून पळ काढला होता. पोलिसांनी चारही संशयित चोरट्यांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.