शेतात कापूस वेचत असताना मजुरांवर अचानक ओढावले ते संकट!; घायाळ होऊन सैरावैरा पळत सुटले…

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात कापूस वेचत असताना अचानक ८ मजुरांना मधमाशांनी हल्ला चढवल्याने हे मजूर घायाळ झाले. मलकापूरच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मधमाशांच्या हल्ल्यातून बैल, गाय आणि पाळीव कुत्रादेखील सुटला नाही. ही घटना काल, 25 फेब्रुवारीला दुपारी साडेबाराच्या सुमारास वडनेर भोलजी (ता. नांदुरा) शिवारात घडली. सूत्रांच्या माहितीनुसार, जुमडे डीपी व सिरसोडी …
 

नांदुरा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेतात कापूस वेचत असताना अचानक ८ मजुरांना मधमाशांनी हल्ला चढवल्‍याने हे मजूर घायाळ झाले. मलकापूरच्‍या खासगी रुग्‍णालयात त्‍यांच्‍यावर उपचार करण्यात आले. मधमाशांच्‍या हल्‍ल्‍यातून बैल, गाय आणि पाळीव कुत्रादेखील सुटला नाही. ही घटना काल, 25 फेब्रुवारीला दुपारी साडेबाराच्‍या सुमारास वडनेर भोलजी (ता. नांदुरा) शिवारात घडली. सूत्रांच्‍या माहितीनुसार, जुमडे डीपी व सिरसोडी शिवार रस्‍त्‍यावरील शेतात कापूस वेचणी सुरू होती. त्‍याचवेळी मधमाशांनी हल्ला चढवला. यात समाधान पांडुरंग जुमडे, अर्जुन पांडुरंग जुमडे, सोनाबाई निखाडे, शिला जुमडे, प्रमिला पांडे यांच्‍यासह ८ मजूर जखमी झाले.