शेतात कुटार झाकण्यासाठी गेलेली विवाहिता परतलीच नाही…

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वादळ सुटल्याने शेतात कुटार झाकण्यासाठी गेलेली 29 वर्षीय विवाहिता गायब झाली आहे. ही घटना शेळगाव आटोळजवळील शिपोरा आंभोरा (ता. जाफराबाद) येथे घडली. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. काल परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता. दरम्यान आकाशात ढग दाटून आल्याने शेतातील हरभरा आणि तूर पिकाचे कुटार झाकण्यासाठी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः वादळ सुटल्याने शेतात कुटार झाकण्यासाठी गेलेली 29 वर्षीय विवाहिता गायब झाली आहे. ही घटना शेळगाव आटोळजवळील शिपोरा आंभोरा (ता. जाफराबाद) येथे घडली. याप्रकरणी अंढेरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

काल परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला होता. दरम्यान आकाशात ढग दाटून आल्याने शेतातील हरभरा आणि तूर पिकाचे कुटार झाकण्यासाठी ज्योती गणेश अंभोरे ही शेतात गेली. रात्र होऊनही ती परत आली नाही. नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही. त्‍यामुळे पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. गोरा रंग, 5.2 फूट उंची, निळी साडी, लाल ब्लाउज, लांब कुरळे केस अशा वर्णनाची महिला आढळल्यास संपर्क साधण्याचे आवाहन अंढेरा पोलिसांनी केले आहे.