शेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह!; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिरसगाव देशमुख (ता. खामगाव) येथील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज, २४ जुलैला दुपारी तीनच्या सुमारास खामगाव- चिखली रोडवरील वृद्धाश्रमामागील शेतातील विहिरीत हा मृतदेह दिसला. शिरसगाव देशमुख येथील शेतकरी सुनील कस्तुरे हे शेतात चक्कर मारायला गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह दिसला. त्यांनी ही माहिती शिरसगावच्या पोलीस …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिरसगाव देशमुख (ता. खामगाव) येथील विहिरीत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज, २४ जुलैला दुपारी तीनच्‍या सुमारास खामगाव- चिखली रोडवरील वृद्धाश्रमामागील शेतातील विहिरीत हा मृतदेह दिसला.

शिरसगाव देशमुख येथील शेतकरी सुनील कस्तुरे हे शेतात चक्कर मारायला गेले असता त्यांना विहिरीत मृतदेह दिसला. त्‍यांनी ही माहिती शिरसगावच्या पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती कळवताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासणीसाठी खामगावच्या सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतदेह अंदाजे २० ते २५ वर्षीय तरुणाचा असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.