शेतात रंगलेल्या जुगार अड्ड्यावर छापा; चौघांना पकडून सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्‍त, शेगाव शहरातील कारवाई

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहराच्या परिसरातील एका शेतात रंगलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख २३ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई काल, 1 मेच्या सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करण्यात आली. पोलीस निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने ही कारवाई केली. एएसआय …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेगाव शहराच्‍या परिसरातील एका शेतात रंगलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी चौघांना ताब्‍यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख २३ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. ही कारवाई काल, 1 मेच्‍या सायंकाळी साडेपाचच्‍या सुमारास करण्यात आली.

पोलीस निरीक्षक संतोष टाले यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने ही कारवाई केली. एएसआय लक्ष्मण नारायण मिरगे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पोलीस उपनिरीक्षक योगेश कुमार दंदे यांना मिळालेल्या माहितीवरून डीबी पथकाने शहराच्‍या परिसरातील एका शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारला. या ठिकाणी पद्माकर प्रल्हाद राठी (५०, रा. मोदीनगर, शेगाव), उमेश साहेबराव शिरसाट (३५, रा. बाभुळगाव जहागीर, जि. अकोला), संजय विश्वनाथ खरे (४२, रा. जिजामातानगर, शेगाव), ज्ञानदेव रघुनाथ घाटे (५९, रा. सांगवा, ता. शेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. त्‍यांच्‍याकडून नगदी १२ हजार ५३० रुपये, ४ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि ४ वेगवेगळ्या कंपनीच्या मोटरसायकली ५२ ताशपत्ते, चादर असा एकूण २ लाख २३ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांविरुध्द शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश कुमार दंदे, लक्ष्‍मण मिरगे, विजय साळवे, उमेश बोरसे, हरिश्चंद्र बारवाल यांनी केली आहे.