शेतात राखण करण्यासाठी गेला अन् उचलले धक्कादायक पाऊल; खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भुईमुगाचे पीक राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याने शेतातच निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 25 मार्चच्या सकाळी 8 पूर्वी घडली. नागसेन दिलीप गवई (19, रा. आवार, ता. खामगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 24 मार्चच्या रात्री तो नेहमीप्रमाणे शेतात गेला. रात्रीतून त्याने धुऱ्यावरील निंबाच्या झाडाला दोरीच्या …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भुईमुगाचे पीक राखण करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याने शेतातच निंबाच्‍या झाडाला गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना 25 मार्चच्‍या सकाळी 8 पूर्वी घडली.

नागसेन दिलीप गवई (19, रा. आवार, ता. खामगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. 24 मार्चच्‍या रात्री तो नेहमीप्रमाणे शेतात गेला. रात्रीतून त्‍याने धुऱ्यावरील निंबाच्‍या झाडाला दोरीच्‍या साह्याने गळफास घेतला. आत्‍महत्‍येचे कारण अस्‍पष्ट आहे. तपास खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोहेकाँ सुनील राऊत करत आहेत.