शेतीच्या बांधावरून वाद, बापलेकाने एकास झोडपले; तिघाविरुद्ध गुन्हा दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) ः शहराजवळील वरवंड शिवारात शेतीच्या बांधावरून वाद होऊन दोघांनी एकास झोडपले. मारहाण आणि शिविगाळ करणार्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप श्रीराम जेऊघाले (39) यांची वरवंड शिवारात गट क्र.152 मध्ये चार एकर शेती आहे. शेजारीच रूस्तुम जेऊघाले यांचे शेत आहे. या दोन्ही कुटूंबांत शेतीच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) ः शहराजवळील वरवंड शिवारात शेतीच्या बांधावरून वाद होऊन दोघांनी एकास झोडपले. मारहाण आणि शिविगाळ करणार्‍या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप श्रीराम जेऊघाले (39) यांची वरवंड शिवारात गट क्र.152 मध्ये चार एकर शेती आहे. शेजारीच रूस्तुम जेऊघाले यांचे शेत आहे. या दोन्ही कुटूंबांत शेतीच्या बांधावरून जुना वाद आहे. हा वाद 19 जानेवारीला उफाळून आला. सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास संदीप जेऊघाले आपल्या शेतात स्प्रिंकलरचा सेट बदलण्यासाठी गेले असता त्यांना दिसून आले की, श्रीकृष्ण रूस्तुम जेऊघाले, रूस्तुम सदाशिव जेऊघाले, प्रमिला रूस्तुम जेऊघाले हे शेतातील बांधावर दगड व माती टाकत होते. यावेळी माझ्या बांधावर दगड व माती टाकू नका, असे म्हणायला गेलेल्या संदीप जेऊघाले यांना श्रीकृष्ण जेऊघाले आणि रूस्तुम जेऊघाले यांनी चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तिघांनीही शिविगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. या तिघांवर कारवाई करावी, अशी तक्रार संदीप जेऊघाले यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिली. या तक्रारीवरून बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी आरोपी श्रीकृष्ण जेऊघाले, रूस्तुम जेऊघाले, प्रमीला रूस्तुम जेऊघाले यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.