शेतीच्‍या वादातून काकाचा खून; अख्खी फॅमिली अटकेत, खामगाव तालुक्‍यातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा ) ः शेतीच्या वादातून पुतण्याने काकाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना अकोली (ता. खामगाव) शिवारात काल, 6 जून रोजी दुपारी 2 च्या सुमारास घडली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. रमेश नरिभाऊ तिडके (70, रा. अटाळी, ता. खामगाव) …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा ) ः शेतीच्‍या वादातून पुतण्याने काकाचा कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना अकोली (ता. खामगाव) शिवारात काल, 6 जून रोजी दुपारी 2 च्‍या सुमारास घडली. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रमेश नरिभाऊ तिडके (70, रा. अटाळी, ता. खामगाव) असे खून झालेल्या व्‍यक्‍तीचे नाव आहे. पंकज सुरेश तिडके (37), सुरेश नरिभाऊ तिडके (61), आशिष सुरेश तिडके (27), सौ. सुनिता सुरेश तिडके (53, सर्व रा. अटाळी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पंकजने भाऊ, वडील व आईच्‍या मदतीने रमेश तिडके यांना शेतीच्‍या कारणावरून हातोडीने जबर मारहाण केली. यात रमेश गंभीर जखमी होऊन कोसळले. यातच त्‍यांचा मृत्‍यू झाला. या प्रकरणी दिनेश रमेश तिडके (40) यांनी हिवरखेड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तपास पोलीस उपनिरिक्षक हरीविजय बोबडे करत आहेत.