शेती विकून घर बांधायला पैसे आण…२४ वर्षीय विवाहितेचा मांडला छळ, नणंद म्‍हणायची, माझ्या भावाला तुझ्यापेक्षा चांगली बायको मिळाली असती…

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आईच्या नावावर असलेली शेती विकून घर बांधायला पैसे घेऊन ये, असे म्हणून २४ वर्षीय विवाहितेचा पतीसह सासरच्यांनी छळ मांडला. तिने मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध काल, ११ ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. काजल नितीन इंगोले (रा. आजेगाव ता. सेनगाव जि. हिंगोली, ह. मु. खामखेड …
 
शेती विकून घर बांधायला पैसे आण…२४ वर्षीय विवाहितेचा मांडला छळ, नणंद म्‍हणायची, माझ्या भावाला तुझ्यापेक्षा चांगली बायको मिळाली असती…

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आईच्‍या नावावर असलेली शेती विकून घर बांधायला पैसे घेऊन ये, असे म्‍हणून २४ वर्षीय विवाहितेचा पतीसह सासरच्यांनी छळ मांडला. तिने मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध काल, ११ ऑगस्‍टला गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.


सौ. काजल नितीन इंगोले (रा. आजेगाव ता. सेनगाव जि. हिंगोली, ह. मु. खामखेड ता.मेहकर) या विवाहितेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. काजलचे लग्‍न नितीन शिवाजी इंगोले (रा. आजेगाव) याच्‍यासोबत १६ मे २०१६ रोजी आरडव (ता. लोणार) येथे झाले होते. तिला पतीपासून एक मुलगा मयूर व मुलगी समीक्षा अशी दोन अपत्‍ये आहेत. तिचे आई- वडील वारलेले असून, आईच्‍या नावाने आरडव येथे दीड एकर शेती आहे. हे शेत ती व तिची आजी पेरत असते. तिचे दीर, सासू- सासरे व नणंद यांनी तिला लग्नानंतर काही दिवस चांगले वागवले. नंतर मात्र तुला घरातले काम येत नाही, असे सांगून तिच्‍या पतीला भडकावून द्यायचे. तिचा पती दारू पिऊन येत तिला मारहाण करायचा. आमच्या भावाला तुझ्यापेक्षा चांगली बायको भेटली असती, असे नणंद बोलून त्रास द्यायची.

तुझ्या आईच्‍या नावाने असलेली शेती विकून घर बांधण्यासाठी पैसे घेऊन ये, नाहीतर तुला आम्ही फारकती देतो, असे म्‍हणून सासरच्यांनी तिला छळायला सुरुवात केली. मात्र आजीचा तो एकमेव उदरनिर्वाहाचा आधार असल्याने तिने नकार दिला असता तिचा सासरच्यांनी मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्‍यामुळे ती आजीच्या घरी खामखेड येथे निघून आली. गेल्या महिन्यात २० जूनला सकाळी तिचा पती व दीर खामखेडला आले व शेती विकण्यासाठी पुन्‍हा दबाव आणून मारहाण केली. शेती विकून पैसे आणले नाही तर तुला जिवाने मारून टाकतो, अशी धमकी दोघांनी देऊन निघून गेले. त्‍यामुळे तिने मेहकर येथील महिला तक्रार निवारण कक्षात तक्रार केली. मात्र तिथेही सासरच्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने अखेर मेहकर पोलीस ठाण्यात तिने तक्रार केली आहे. त्‍यावरून पती नितीन, सासरे शिवाजी नारायण इंगोले, सासू शशिकला, दीर राहुल, नणंद संगीता विनोद फुंडसे (रा. राहुली ता. सेनगाव जि. हिंगोली), नणंद अनिता डुकरे (रा. परतापूर), नणंद सीमा राजू चाटसे (रा. आजेगाव ता.सेनगाव) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.