शेत नांगरणीच्‍या वादातून शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार; संग्रामपूर तालुक्‍यातील घटना

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेत नांगरल्याच्या वादावरून सोगोडा (ता.संग्रामपूर) येथील तिघांनी कुर्हाडीने मारहाण करून सोनाळा (ता. संग्रामपूर) येथील शेतकऱ्यास जखमी केले. या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील गजानन नारायण ढोले यांनी 3 मार्च रोजी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की 2 मार्च …
 

संग्रामपूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेत नांगरल्याच्‍या वादावरून सोगोडा (ता.संग्रामपूर) येथील तिघांनी कुर्‍हाडीने मारहाण करून सोनाळा (ता. संग्रामपूर) येथील शेतकऱ्यास जखमी केले. या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्रामपूर  तालुक्यातील सोनाळा येथील गजानन नारायण ढोले यांनी 3 मार्च  रोजी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की 2 मार्च  रोजी हिवरखेड येथून दुपारी 12 च्‍या सुमारास सोनाळा येथे घरी परत येत असताना सोगोडा फाटा येथे सोनाळा येथील वासुदेव रामभाऊ झाल्टे व त्यांचे चुलत भाऊ मनोहर लक्ष्मण झाल्टे, त्यांची मुले संदीप व मोहन यांच्‍यामध्ये भांडण सुरू होते. तेव्हा मी माझी गाडी बाजूला लावून त्यांचे भांडण सोडवण्यासाठी गेलो असता मनोहर झाल्टे यांनी वासुदेव झाल्टे यांना पकडून  कुर्‍हाडीने वासुदेव यांच्यावर वार केला. वासुदेव झाल्टे यांनी ती कु-हाड हाताने अडविली. त्यामुळे त्यांच्‍या हाताला व डोक्याला मार लागला व मोहन काठीने त्यांचे पाठीवर मारहाण करीत होता. मी वासुदेव यांना सोडविले. तेव्‍हा सर्व जण पळून गेले. मी वासुदेव यांचा मुलगा श्रीकृष्ण झाल्टे यांना बोलावून घेतले व त्यांना सोनाळा येथे रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे डॉक्टरांनी उपचार करून शेगावला हलवले. हा वाद शेत नांगल्याचे कारणावरुन झाला. या तक्रारीवरून तिघांविरुद्ध सोनाळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. तपास सोनाळा पोलीस करीत आहेत.