शेळगाव आटोळमध्ये उगवणार विकासाची पहाट!; वैदूवाडीतील स्मशानभूमीच्या प्रश्‍नासह मार्गी लागणार अनेक समस्या; जनसेवा परिवर्तन पॅनलच्या आराखड्यात सर्वांगिण विकासाची झलक!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निवडणुका आल्या की गावपुढार्यांची आश्वासने ठरलेलीच… वैदू समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. तो सोडविण्याची ग्वाही द्यायची, समाजाची मते घ्यायची अन् मग विसरून जायचे हा शिरस्ता पडला आहे… पण यंदा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी आशा त्यांना वाटत आहे. कारण जनसेवा परिवर्तन पॅनलच्या ठोस आराखड्यात त्यांच्या स्मशानभूमीचाही समावेश आहे. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः निवडणुका आल्या की गावपुढार्‍यांची आश्‍वासने ठरलेलीच… वैदू समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. तो सोडविण्याची ग्वाही द्यायची, समाजाची मते घ्यायची अन् मग विसरून जायचे हा शिरस्ता पडला आहे… पण यंदा त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतील अशी आशा त्यांना वाटत आहे. कारण जनसेवा परिवर्तन पॅनलच्या ठोस आराखड्यात त्यांच्या स्मशानभूमीचाही समावेश आहे. गावातील अनुभवी, नवयुवक आणि सज्जन मंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या पॅनलमुळे वैदू समाजाला निराशेच्या गर्तेतून बाहेर पडण्यास मदत मिळणार आहे. या समाजाचा केवळ स्मशानभूमीचाच नव्हे तर रस्ते, वीज, पाणीपुरवठा, घरकुले, शिक्षणाचा प्रश्‍नही या पॅनलने सोडविण्याचा निर्धार केला आहे.

केवळ निर्धारच नाही तर त्या दृष्टीने नियोजनही केल्याच्या त्यांच्या आराखड्यातून स्पष्ट होते. वैदू समाजाचे अनेक प्रश्‍न आहेतच, पण गावातही अनेक समस्या मार्गी लागलेल्या नाहीत. इतक्या वर्षांत या समस्यांत भरच पडत गेली आहे. आता मात्र शेळगाव आटोळसाठी अच्छे दिन नक्की येतील, असे ग्रामस्थांना जनसेवा परिवर्तन पॅनलमुळे वाटू लागले आहे. स्वच्छ चारित्र्य आणि उच्चशिक्षित असलेल्या जनसेवा परिवर्तन पॅनलमधील उमेदवारांनी विकासाचे व्हिजनच जाहीर केले आहे. हे व्हिजन पूर्ण करण्याचे स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून निवडणुकीत उडी घेतल्याने आजवर केवळ ग्रामस्थांना आश्‍वासनांची खैरात वाटणार्‍या विरोधी पॅनलला धडकी भरली आहे. जनसेवा परिवर्तन पॅनलकडून अपेक्षा वाढल्या असून, या पॅनलचे उमेदवार पाहता त्या पूर्ण होतील अशी खात्री असल्याचे ग्रामस्थांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले.

वैदू समाजाचे प्रश्‍न वर्षभरात मार्गी लावणार ः देवेंद्र मिसाळ

सत्ता आल्यानंतर वैदूवाडीतील सर्व समस्यांसह स्मशानभूमीचा प्रश्‍न वर्षभरात निकाली काढणार आहे. जनतेच्या सेवेसाठी जनतेने जनसेवा परिवर्तन पॅनलला संधी द्यावी, असे आवाहन पॅनलचे नेते देवेंद्र मिसाळ यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना ग्रामस्थांना केले.