शौचालयाच्या टाकीत पडली गाय… बाहेर काढण्यासाठी नगराध्यक्षांसह नगरपरिषद कर्मचारी ४ तास झटले!; मलकापुरातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शौचालयाच्या टाकीत पडलेल्या गायीचे प्राण वाचविण्यात नगराध्यक्ष व नगरपालिका प्रशासनाला यश आले. आज, २६ जुलै रोजी सकाळी सातपासून अकरापर्यंत गायीला वाचविण्याची धडपड सुरू होती. मलकापुरातील विष्णूवाडी भागात ही घटना घडली. दिलीप भोळे यांच्या शौचालयाच्या टाकीच्या स्लॅबवर गाय गेली असता स्लॅब तुटला व गाय टाक्यात पडली होती. तिची टाक्यातून बाहेर निघण्यासाठीची …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शौचालयाच्या टाकीत पडलेल्या गायीचे प्राण वाचविण्यात नगराध्यक्ष व नगरपालिका प्रशासनाला यश आले. आज, २६ जुलै रोजी सकाळी सातपासून अकरापर्यंत गायीला वाचविण्याची धडपड सुरू होती. मलकापुरातील विष्णूवाडी भागात ही घटना घडली.

दिलीप भोळे यांच्या शौचालयाच्या टाकीच्या स्लॅबवर गाय गेली असता स्लॅब तुटला व गाय टाक्यात पडली होती. तिची टाक्यातून बाहेर निघण्यासाठीची धडपड पाहून परिसरातील नागरिकांची धावपळ सुरू झाली. याबाबतची माहिती नागरिकांनी नगराध्यक्ष ॲड हरीश रावळ यांना दिली. श्री. रावळ जेसीबीसह घटनास्थळी पोहोचले. नगर परिषद आरोग्य विभागाचे मिलिंद कंडारकर, यशवंत जगताप, संतोष टाक, अमर निथाने, अग्निशामन दलाचे वासुदेव भोपळे, कृष्णा निथाने, धनराज काकर, कृणाल वाघरे, विजय काळे, विजय शर्मा, संदीप पाटील, राजू शर्मा, सुशील शर्मा, महेश शर्मा घटनास्थळी दाखल झाले. शौचालयाचे टाके खाली करून तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेसीबीच्या साह्याने नगर परिषद कर्मचाऱ्यांनी शौचालयाच्या टाक्यात उतरून गाईला बाहेर काढले.