शौचास गेलेली विवाहिता गायब; बुलडाण्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शौचाला गेलेली 35 वर्षीय विवाहिता गायब झाल्याची घटना बुलडाणा शहरात समोर आली आहे. आज 25 फेब्रुवारीला विवाहितेच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात बायको हरवली असल्याची तक्रार दिली आहे.मंगला अनिल लोखंडे (35, रा. वाॅर्ड नं. 2,बुलडाणा) ही महिला 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता शौचास जाते सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ होऊनही …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शौचाला गेलेली 35 वर्षीय विवाहिता गायब झाल्याची घटना बुलडाणा शहरात समोर आली आहे. आज 25 फेब्रुवारीला विवाहितेच्या पतीने शहर पोलीस ठाण्यात बायको हरवली असल्याची तक्रार दिली आहे.
मंगला अनिल लोखंडे (35, रा. वाॅर्ड नं. 2,बुलडाणा) ही महिला 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता शौचास जाते सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. मात्र ती सापडली नाही. काळा सावळा रंग, 5 फूट उंची, अंगात हिरव्या रंगाची साडी अन्‌ लाल ब्लाउज अशा वर्णनाची महिला दिसल्यास बुलडाणा शहर पोलिसांना कळवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.