श्रींच्‍या प्रगटदिन महोत्‍सवात भाविकांना नाही होता येणार सहभागी!; कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे खबरदारी!; घरूनच घ्या दर्शन!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विदर्भाची पंढरी संतनगरी शेगावात यावर्षी 5 मार्च रोजी श्री संत गजानन महाराजांचा १४३ वा प्रगटदिन महोत्सव मर्यादित स्वरुपात साजरा होणार आहे. यात भाविकांना सामील होता येणार नाही. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मंदिरातच कार्यक्रम होऊन महोत्सव साजरा होईल. घरीच पूजा करून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले …
 


शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) : विदर्भाची पंढरी संतनगरी शेगावात यावर्षी 5 मार्च रोजी श्री संत गजानन महाराजांचा १४३ वा प्रगटदिन महोत्‍सव मर्यादित स्‍वरुपात साजरा होणार आहे. यात भाविकांना सामील होता येणार नाही. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मंदिरातच कार्यक्रम होऊन महोत्‍सव साजरा होईल. घरीच पूजा करून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी श्रींचा प्रगटदिन विविध धार्मिक कार्यक्रमांसह लाखो भाविक भक्तांच्या व वारकऱ्यांच्‍या उपस्थितीत साजरा होतो. मागील वर्षापासून आतापर्यंत कोरोना महामारीचे संकट पसरले असल्याने तसेच कोविड विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाचे निर्देशानुसार प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे निर्देश असल्याने प्रगटदिन उत्सव सालाबादाप्रमाणे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार नाही. उत्सवातील कार्यक्रम धार्मिक परंपरेनुसार मोजक्या मंडळीच्‍या उपस्थितीत अंतर्गतच होतील, अशी माहिती श्री गजानन महाराज संस्थानकडून देण्यात आली आहे.