श्रीराम मंदिर निर्माण करण्यासाठी एकवटली नारीशक्ती!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण अभियान निधी समर्पण कार्यासाठी बुलडाणा नगरीच्या विविध भागांतून आलेल्या नारीशक्तीची बैठक गर्दे वाचनालय परिसरातील फुलबाग बालक मंदिरात पार पडली.प्रारंभी प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यावर प्रस्तावनेत प्रा. विजयराव जोशी यांनी मंदिर निर्माण कार्याची रूपरेषा सांगितली. यावेळी अभियान काळात आपली भूमिका कशी पार पाडायची याचे नियोजन जिल्हा …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) ः अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण अभियान निधी समर्पण कार्यासाठी बुलडाणा नगरीच्या विविध भागांतून आलेल्या नारीशक्तीची बैठक गर्दे वाचनालय परिसरातील फुलबाग बालक मंदिरात पार पडली.
प्रारंभी प्रभू श्रीराम प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यावर प्रस्तावनेत प्रा. विजयराव जोशी यांनी मंदिर निर्माण कार्याची रूपरेषा सांगितली. यावेळी अभियान काळात आपली भूमिका कशी पार पाडायची याचे नियोजन जिल्हा संयोजक कुटुंबप्रबोधन  अनंत कुळकर्णी यांनी विषद केले. समारोपात चित्तरंजन राठी यांनी राममंदिर ते राष्ट्रमंदिर निर्माण कसे होईल यावर प्रकाश टाकला. बैठकीला प्रज्ञा कुळकर्णी, पद्मजा अहिर, मंजुषा सराफ, शारदा कमानी, शर्वरी तारे,  तेजस्विनी गोडबोले, मेघना पेठे, सुवर्णा  देशमुख, विजया राठी, अश्‍विनी  वाईकर, श्रीमती तारे,  रुपाली कुळकर्णी, रेवती भालेराव, नीता कुळकर्णी हजर होत्या. आयोजनसाठी विवेक उबरहंडे, अतुल डिडोळकर, राहुल कुळकर्णी यांनी सहकार्य केले.