संगणक टंकलेखन परीक्षा २ मार्चपासून

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेतल्या जाणाऱ्या संगणक टंकलेखन परीक्षा 2 मार्चपासून घेण्यात येणार असल्याचे परिषदेच्या आयुक्तांनी कळविले आहे. संबंधित संस्थांना विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र प्राप्त झाले आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक संस्था बंद आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेत जाऊन प्रवेशपत्र प्राप्त करावे. परीक्षा वेळेत जर गावात लॉकडाऊन असले तरी परीक्षा …
 

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे घेतल्या जाणाऱ्या संगणक टंकलेखन परीक्षा 2 मार्चपासून घेण्यात येणार असल्याचे परिषदेच्‍या आयुक्तांनी कळविले आहे. संबंधित संस्थांना विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र प्राप्त झाले आहे.  लॉकडाऊन असल्यामुळे अनेक संस्था बंद आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेत जाऊन प्रवेशपत्र प्राप्त करावे.  परीक्षा वेळेत जर गावात लॉकडाऊन असले तरी परीक्षा केंद्रावर जाता येईल. परीक्षेला जाताना प्रवेशपत्र, आधार कार्ड सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच तोंडाला मास्क व सुरक्षित अंतर आदी गोष्टी कटाक्षने पाळाव्‍या लागतील, अशी माहिती जिल्हा प्रतिनिधी अरूण चांडक यांनी दिली.