संग्रामपूरमध्ये आमदार डॉ. कुटे यांची सूचना ः रुग्‍णांना होम क्‍वारंटाइन करू नका, केंद्रात आणून उपचार करा

बुलडाणा (मनोज सांगळे मो. 9822988820, बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाइन करू नका. त्यांना गावात फिरू न देता सेंटरमध्ये आणून उपचार करा, असे निर्देश आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिले. काल, 15 मे रोजी सायंकाळी सहाला आमदार डॉ. कुटे यांनी संग्रामपूर येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड उपचार केंद्राला भेट देऊन पाहणी केली. …
 

बुलडाणा (मनोज सांगळे मो. 9822988820, बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्‍णांना होम क्‍वारंटाइन करू नका. त्‍यांना गावात फिरू न देता सेंटरमध्ये आणून उपचार करा, असे निर्देश आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिले.

काल, 15 मे रोजी सायंकाळी सहाला आमदार डॉ. कुटे यांनी संग्रामपूर येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड उपचार केंद्राला भेट देऊन पाहणी केली. सोबत जिल्हा शल्य चिकित्‍सक डॉ. प्रशांत पाटील उपस्‍थित होते. यावेळी रुग्‍णांची संवाद साधून डॉ. कुटे यांनी त्‍यांना मानसिक धीर दिला. या ठिकाणी आवश्यक सुविधा दिल्या जात असल्या तरी लवकरच येथे ऑक्सिजन प्‍लांट सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याने श्री. कुटे म्‍हणाले. सुविधेतील उणिवा भरून काढण्याच्‍या सूचना त्‍यांनी यंत्रणेला दिल्या. नवीन प्रशासकीय इमारतीत हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले असून, सध्या 10 रुग्‍ण भरती आहेत. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्‍ज्‍वला पाटील, तहसीलदार तेजश्री कोरे, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत विखे आदींची उपस्‍थिती होती.