संग्रामपूर तालुक्‍यात पकडला 10 लाखांचा गुटखा!; ‘एलसीबी’ची कारवाई

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने संग्रामपूर तालुक्यातील लाडनापूर शिवारात छापा मारून तिघांकडून तब्बल 10 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई 21 मे रोजी करण्यात आली. नितीन सुरेश जैस्वाल, देविलाल सज्जनलाल जैस्वाल, धीरज सुखलाल जैस्वाल (फरार) (तिघे रा. लाडनापूर) अशी आरोपींची नावे आहेत. गुटखा 10,32,872 रुपयांचा गुटखा …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने संग्रामपूर तालुक्‍यातील लाडनापूर शिवारात छापा मारून तिघांकडून तब्‍बल 10 लाख रुपयांचा गुटखा जप्‍त केला आहे. ही कारवाई 21 मे रोजी करण्यात आली.

नितीन सुरेश जैस्वाल, देविलाल सज्जनलाल जैस्वाल, धीरज सुखलाल जैस्वाल (फरार) (तिघे रा. लाडनापूर) अशी आरोपींची नावे आहेत. गुटखा 10,32,872 रुपयांचा गुटखा आणि  चारचाकी वाहन  5,50,000 असा  एकूण  15,82,872 रुपयांचा  मुद्देमाल आरोपींकडे मिळाला आहे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बळीराम गिते यांच्‍या आदेशाने सोनाळा पोलीस ठाण्याच्‍या हद्दीत मिळालेल्या गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. कारवाईत सहायक पोलीस निरिक्षक मनिष  गावंडे, पोहेकाँ सुधाकर  काळे, पोहेकाँ सय्यद हरुन, पो.ना. लक्ष्मण कटक, पो. ना.  दीपक पवार, पो. ना. सुनील खरात, पो. ना. संजय नागवे, चालक सुरेश  भिसे यांनी भाग घेतला.