संचारबंदीत ‘चाके’ थांबणार नाहीत!; प्रशासनाने घेतली दक्षता, विविध घटकांना दिली सूट

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करतानाही अर्थचक्रच काय कोणतेही चाक एकदमच ठप्प होणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यासाठी विविध घटकांना कमीअधिक 60 तासांवरच्या जनता कर्फ्यूमधून सूट देण्यात आली आहे. नागरी भागात आज दुपारी 3 तर ग्रामीण भागात संध्याकाळी 5 वाजेपासून मॅरेथॉन संचारबंदीला सुरुवात झाली आहे. मात्र अर्थ, संचार, …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करतानाही अर्थचक्रच काय कोणतेही चाक एकदमच ठप्प होणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यासाठी विविध घटकांना कमीअधिक 60 तासांवरच्या जनता कर्फ्यूमधून सूट देण्यात आली आहे.

नागरी भागात आज दुपारी 3 तर ग्रामीण भागात संध्याकाळी 5 वाजेपासून मॅरेथॉन संचारबंदीला सुरुवात झाली आहे. मात्र अर्थ, संचार, माल वाहतूक एकदम ठप्प पडणार नाही याची खबरदारी आदेशात जिल्‍हाधिकाऱ्यांनी घेतली! यामुळे पेट्रोलपंप, मालवाहतूक, एसटी प्रवासी वाहतूक 24 तास सुरू राहणार आहे. अर्थात लालपरीला काटेकोर नियमांचे पालन करून 50 टक्केच प्रवासी वाहतूक करण्यात येईल. एवढेच काय टायर पंक्चरची दुकाने नियमित वेळेत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय खासगी, नागरी बँक नियमित वेळेत सुरू राहणार आहे. तसेच ठरलेल्या परीक्षा पूर्वनियोजित तारीख व वेळेवरच पार पडणार आहे. संचारबंदीचा यावर साइड इफेक्ट होणार नाहीये!