संचारबंदीत चोरट्यांची चांदी!; बुलडाण्यात आणखी एक घरफोडी; 4 लाखांचा ऐवज लंपास

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः एकीकडे संचारबंदी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र चोरट्यांची जणू रोजच चांदी सुरू आहे. काल तीन चोरीच्या घटनांवर चर्चा सुरू असतानाच आज, 22 फेब्रुवारीच्या सकाळी आणखी एक घरफोडी झाल्याचे समोर आल्याने एकूणच चोरटे पोलिसांना आव्हान तर देत नाहीत ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील चेतनानगरात घर फोडून 4 लाख रुपयांचा ऐवज …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः एकीकडे संचारबंदी सुरू असतानाच दुसरीकडे मात्र चोरट्यांची जणू रोजच चांदी सुरू आहे. काल तीन चोरीच्‍या घटनांवर चर्चा सुरू असतानाच आज, 22 फेब्रुवारीच्‍या सकाळी आणखी एक घरफोडी झाल्‍याचे समोर आल्‍याने एकूणच चोरटे पोलिसांना आव्‍हान तर देत नाहीत ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील चेतनानगरात घर फोडून 4 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

शहरातील खामगाव रोडवरील मारुती शोरूममागे राहणारे प्रशांत सोळंके यांच्या घरी ही चोरी झाली. मोरे हे कुटुंबासह काल 21 रोजी रात्री 8 वाजता चिखली येथे नातेवाईकांकडे गेले होते. आज सकाळी 9 वाजता ते परतले असता त्यांना घराचे लॉक तुटलेले दिसले. घरात गेल्यानंतर घरातील सामानही अस्ताव्यस्त पडलेले होते. घरातील कापाटातुन 45 हजार रोख व साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. चोरी झाल्याची माहिती पोलिसांना कळवली जाताच ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी ताफ्यासहीत घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि ठसेतज्‍ज्ञांना पाचारण करण्यात आले. यावेळी श्वानाने चिखली रोडवरील हाजी मलंग दर्ग्यापर्यंत माग काढल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. प्रकरणाचा तपास पीएसआय सुधाकर गवारगुरू करीत आहेत.