संचारबंदीत बिबट्या, अस्‍वल बुलडाण्यात ‘मोकळे’!

बुलडाणा ( कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराच्या सौंदर्यात भर घालणारे बिबट्या अन् अस्वलाचे पुतळे वर्षभरापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज, 24 फेब्रुवारीला या लोकार्पणाला मुहूर्त मिळाला आणि बिबट्या अन् अस्वलाने मोकळा श्वास घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अस्वल आणि त्रिशरण चौकात बिबट्याचा पुतळा वन्यजीव विभागामार्फत उभारण्यात आला होता. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजीच पालकमंत्री …
 

बुलडाणा ( कृष्णा सपकाळः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहराच्या सौंदर्यात भर घालणारे बिबट्या अन्‌ अस्वलाचे पुतळे वर्षभरापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत होते. अखेर आज, 24 फेब्रुवारीला या लोकार्पणाला मुहूर्त मिळाला आणि बिबट्या अन्‌ अस्वलाने मोकळा श्वास घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अस्वल आणि त्रिशरण चौकात बिबट्याचा पुतळा वन्यजीव विभागामार्फत उभारण्यात आला होता. गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजीच पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव आणि तत्कालिन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण होणार होते. त्यांच्या नावाच्या कोनशिला सुद्धा बसविण्यात आल्या होत्या. मात्र कोविड संकटामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. त्यानंतर यावर्षी 26 जानेवारी रोजी लोकार्पण होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र त्यादिवशी सुद्धा कुठलेही कारण न देता लोकार्पण लांबणीवर पडले. त्यामुळे वन्यजीव प्रेमींकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अखेर आज जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक व्ही. जी. साबळे यांच्या हस्ते वनअधिकारी व इतर कर्मचारी व पर्यटन गाईड यांच्या उपस्थितीत दोन्ही पुतळ्यांचे लोकार्पण करण्यात आले.