संजय राऊत शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का?; काँग्रेस प्रवक्ते नाना पटोले यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी तीन पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेदरम्यान सर्व काही आलबेले आहे असे वाटत असले तरीही अंतर्गत नाराजी अधूनमधून उफाळून येत असतेच. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे नेते,खासदार संजय राऊत यांन काँग्रेसप्रणित युपीए आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी करण्याची वेळ आणि गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर …
 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी तीन पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेदरम्यान सर्व काही आलबेले आहे असे वाटत असले तरीही अंतर्गत नाराजी अधूनमधून उफाळून येत असतेच. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे नेते,खासदार संजय राऊत यांन काँग्रेसप्रणित युपीए आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी करण्याची वेळ आणि गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावर आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मुद्यावर मुळात शिवसेनेला बोलण्याचा अधिकारच नाही. कारण तो पक्ष यूपीए आघाडीचा घटक पक्ष नाही.त्यामुळे त्यांचे मत आम्ही फारसे गांभीर्याने घेणार नाही.शिवाय संजय राऊत हे शरद पवारांचे प्रवक्ते आहेत का? असा प्रश्न आम्ही मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. त्यावर ते काय उत्तर देतात हे पाहावे लागेल,असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात नाशिक येथे माध्यमांशी बोलताना युपीए आघाडीच्या नेतृत्वासाठी शरद पवारांच्या नावाची पाठराखण केली होती. सोनिया गांधी तब्येतीच्या कारणास्तव आघाडीचे नेतृत्व करू शकत नाहीत. त्यामुळे आता पवारांनी नेतृत्व हाती घ्यावे आणि केंद्र सरकारविरोधात विरोधी पक्षांची एकजूट करावी. पवारांचे नेतृत्व त्यादृष्टीने विश्वासार्ह आहे,असा दावाही राऊत यांनी केला होता. त्यांच्या विधानामुळे काँग्रेस पक्षात नाराजी व्यक्त होत होती. पवारांचे मित्र तथा नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूक अब्दुल्ला यांनीही काँग्रेसला खडे बोल सुनावले होते. यापार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले असून त्यांना याबाबतीत मत मांडण्याचा अधिकारच नाही. युपीएचे नेतृत्व कुणी करावे हे त्या आघाडीच्या पक्षांनीच ठरवले पाहिजे. त्यांनीच सोनिया गांधींचे नेतृत्व मान्य केले आहे. त्यामुळे इतरांनी त्याबाबत चर्चा करू नये, असा टोला पटोले यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्याने महाविकास आघाडीत पुन्हा एकदा नाराजीची ठिणगी पडू शकते.