संतप्‍त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याचे कार्यालय फोडले!; मेहकरमधील प्रकार, अधिकारी “फिरवत’ असल्याने राग अनावर!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फळबाग अनुदान योजनेसाठी अर्ज करूनही कृषी सहायकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी मेहकर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तोडफोड केली. ही घटना आज, २ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास मेहकर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात घडली. आंदोलनकर्ते शेतकरी संजय सुळकर यांनी यासंदर्भात बुलडाणा लाइव्हला माहिती देताना सांगितले, की …
 
संतप्‍त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याचे कार्यालय फोडले!; मेहकरमधील प्रकार, अधिकारी “फिरवत’ असल्याने राग अनावर!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः फळबाग अनुदान योजनेसाठी अर्ज करूनही कृषी सहायकांकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याने संतप्‍त शेतकऱ्यांनी मेहकर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तोडफोड केली. ही घटना आज, २ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्‍या सुमारास मेहकर येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात घडली.

संतप्‍त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याचे कार्यालय फोडले!; मेहकरमधील प्रकार, अधिकारी “फिरवत’ असल्याने राग अनावर!!

आंदोलनकर्ते शेतकरी संजय सुळकर यांनी यासंदर्भात बुलडाणा लाइव्हला माहिती देताना सांगितले, की उटी येथील जवळपास १५ शेतकऱ्यांनी ही तोडफोड केली. उटी येथील १० ते १५ शेतकऱ्यांची नावे फळबाग अनुदान योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या कृती आराखड्यात घेण्यात आली होती. काही शेतकऱ्यांनी मागील वर्षी फळबागासुद्धा लावल्या. मात्र त्यांना अनुदान मिळाले नाही. या संदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार कृषी सहायक डी. एल. देशमुख यांना विचारणा केली असता तुम्ही पहिले ५ हजार द्या नंतर मी अनुदान मंजूर करतो असे देशमुख शेतकऱ्यांना म्हणाले.

संतप्‍त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्याचे कार्यालय फोडले!; मेहकरमधील प्रकार, अधिकारी “फिरवत’ असल्याने राग अनावर!!

कृषी सहायकांची तक्रार कृषी अधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांनी जून महिन्यातच केली होती. मात्र कृषी अधिकाऱ्यांनी सुद्धा उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.कृषी अधिकारी काळे यांनी उटी येथील शेतकऱ्यांना गुरुवारी भेटा असे सांगितले होते. मात्र शेतकरी कार्यालयात गेले असता तिथे कृषी अधिकारी काळे हजर नव्हते. शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक देशमुख यांना विचारणा केली असता तुम्ही माझ्याकडे येऊ नका, असे उत्तर देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यलयातील खुर्च्या व संगणकाची तोडफोड केली. वृत्त लिहीपर्यंत तोडफोडीची तक्रार पोलिसांत दिलेली नव्‍हती.