संतापजनक! नराधम बापाने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्‍याचार करून पाजले विष; बुलडाणा तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वतःच्या 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून नराधम बापाने तिला विष पाजले. ही नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना मातला (ता. बुलडाणा) येथे समोर आली आहे. याप्रकरणी नराधम बापाला काल, 30 मे रोजी रात्री 10 वाजता रायपूर पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मातला येथील 41 वर्षीय …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः स्वतःच्या 16 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून नराधम बापाने तिला विष पाजले. ही नात्याला काळिमा फासणारी संतापजनक घटना मातला (ता. बुलडाणा) येथे समोर आली आहे. याप्रकरणी नराधम बापाला काल, 30 मे रोजी रात्री 10 वाजता रायपूर पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मातला येथील 41 वर्षीय नराधम बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर 27 मेच्या सायंकाळी लैंगिक अत्याचार केला. घडलेली घटना कोणाला सांगितली तर जीवे मारण्याची धमकी देऊन तिला मारहाण केली. इतक्यावरच न थांबता मुलीने या अत्याचाराचा प्रतिकार केला असता त्‍याने तिला विषारी औषध पाजले. पीडितेला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती रायपूर पोलिसांना मिळाल्यानंतर ठाणेदार सुभाष दुधाळ स्वतः 30 मे रोजी दुपारी एका पोलीस अधिकाऱ्यासोबत बुलडाणा सामान्य रुग्‍णालयात पोहोचले व पीडितेची विचारपूस केली. यानंतर पोलिसांनी रायपूर ठाण्यात काल रात्री 9 वाजता आरोपी पित्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्‍याला अटक केली.

आज 31 मे रोजी आरोपीला बुलडाणा न्यायालयात हजर केले असता त्याची पुढील दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तपास ठाणेदार सुभाष दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेंद्र मोरे करत आहेत. पीडित अल्पवयीन मुलगी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.