संतापजनक! पीडितेने ‘Buldana Live’मार्फत मागितला एसपींकडे न्‍याय!; व्‍हिडिओ करून पाठवला, म्‍हणाली वरिष्ठांकडे तपास द्या!; केवळ रेप नव्‍हता, गँगरेप होता!!, आरोपींना अजून अटक नसल्याने पोलिसांच्‍या भूमिकेवर केला संशय व्‍यक्‍त!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसेल; परंतु ‘लाइव्ह ग्रुप’ने न्याय देण्याचा वसा घेतला असल्याने कुणा पीडितेने न्यायाची याचना केली आणि ‘बुलडाणा लाइव्ह’ने टाळले असे कधीच होणार नाही. अंभोडा (ता. बुलडाणा) येथे झालेल्या रेपची घटना तेवढ्यापुरती मर्यादित नसून, पीडितेवर गँगेरप झाल्याचे तिने स्वतः बुलडाणा लाइव्हशी संपर्क करून सांगितले आहे. तिने स्वतःचा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ही बातमी वाचून तुम्‍हाला धक्‍का बसेल; परंतु ‘लाइव्‍ह ग्रुप’ने न्‍याय देण्याचा वसा घेतला असल्याने कुणा पीडितेने न्यायाची याचना केली आणि ‘बुलडाणा लाइव्‍ह’ने टाळले असे कधीच होणार नाही. अंभोडा (ता. बुलडाणा) येथे झालेल्या रेपची घटना तेवढ्यापुरती मर्यादित नसून, पीडितेवर गँगेरप झाल्याचे तिने स्‍वतः बुलडाणा लाइव्‍हशी संपर्क करून सांगितले आहे. तिने स्‍वतःचा व्‍हिडिओ करून पाठवला असून, या व्‍हिडिओत घटनेबद्दल सविस्‍तर सांगतानाच, पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. कर्तव्यदक्ष एसपी सरांनी या घटनेचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देऊन न्‍याय मिळवून द्यावा, अशी मागणी तिने व्‍हिडिओत केली आहे. लग्‍नाचे आमिष दाखवून 7 वर्षे बलात्‍कार केल्यानंतर, तिला आशेचा किरण दाखवत अंभोडा येथे अपहरण करून नेण्यात आले होते. तिथे गँगरेप झाल्याचा आरोप तिने केला आहे. त्‍यानंतर तिला जीवे मारण्याच्‍या उद्देशाने शेतात नेत असताना तिने पळ काढला होता. त्‍या रात्रीच बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून तिने तक्रार नोंदविण्याचा प्रयत्‍न केला. मात्र तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही. मलाच अपशब्‍द वापरण्यात आले, असा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. आरोपींना अटक करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत. आरोपींचे फोन चालू आहेत, मात्र पोलीस मला बंद असल्याचे सांगतात, आरोपी घरी सापडत नसल्याचे सांगतात, असेही पीडितेने म्‍हटले आहे.

पहा तिचा व्हिडिओ ः

काय होती घटना…

24 वर्षीय कल्याणी (काल्पनिक नाव) ही अमरावती येथील आहे. 2016 मध्ये तिची मोहन तायडेशी (29, रा. अंभोडा, ता. बुलडाणा) फेसबुकवरून मैत्री झाली. मोहन सीमा सुरक्षा दलाचा जवान आहे. बिहारमध्ये त्‍याची नियुक्‍ती आहे. फेसबुकवर चॅटिंग करताना दोघांतील मैत्री फुलली. दोघे कॉलवर आले. त्‍यातून प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर दोघांत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्‍थापित झाले. 2018 मध्ये दोघांनी शेगाव येथे लग्‍न केले. मात्र या लग्‍नाची कल्पना घरच्यांना देण्यात आली नव्हती. त्यानंतर कल्याणीने मोहनकडे त्याच्‍या गावी घेऊन जाण्याचा आग्रह केला. मात्र मोहन जातीचे कारण देऊन घरचे तुला स्वीकारणार नाहीत म्हणून टाळाटाळ करत राहिला. एक दिवस त्‍याने त्‍याचा चक्‍क मोबाइल बंद केल्याने ती हादरून गेली. त्याच्याशी संपर्क होऊ शकत नसल्याने हवालदील झाली. फसवणूक झाल्याचे तिच्‍या फार उशिरा लक्षात आले होते. तिने या विरोधात न्‍याय मिळण्यासाठी मे 2020 मध्ये अमरावतीच्‍या राजपेठ पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दिली. त्यानंतर हा गुन्हा शेगाव शहर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.  खामगावच्या न्यायालयात खटला उभा राहिला. 17 एप्रिल 2021 रोजी मोहनच्या भाऊजीने कल्याणीला फोन करून प्रकरण आपसात मिटवून टाकू. तुझे लग्न मोहनसोबत लावून देतो, असे म्हणत खामगावला यायला सांगितले. 20 एप्रिलला ती खामगावला आली. तेव्हा मोहन, त्याचे वडील, भाऊजी आणि आणखी एक अनोळखी व्‍यक्‍तीने तिला गोडगोड बोलून गाडीत बसवले. रात्रीच तिला अंभोडा येथे आणण्यात आले. मोहनच्या घरी गेल्यानंतर घरातील महिला कल्याणीच्या अंगावर धावून आल्या. तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी तिच्‍यावर गँगरेप झाल्‍याचा आरोप तिने व्हिडिओत केला आहे. एवढ्यावरच हे कारस्‍थान थांबले नाही. कदाचित मोहनच्‍या डोक्‍यात वेगळेच काहीतरी शिजत असावे. त्‍याने भाऊजीच्‍या मदतीने तिला शेतात नेण्याचा प्‍लॅन केला. मात्र मध्येच गाडी बंद पडली. गाडी दुरुस्त करण्यासाठी दोघे उरतले असता कल्याणीने संधी साधू रात्री उशिरा पळ काढला होता.

यांच्‍याविरुद्ध आहेत बलात्‍कारासह ॲट्रॉसिटीचे गुन्‍हे दाखल

या प्रकरणात मुख्य आरोपी मोहन साहेबराव तायडे (29), साहेबराव तायडे, गजानन तायडे, प्रेमानंद पवार, मीरा पवार, रामकोर तायडे, सुवर्णा तायडे, प्रतिभा तायडे, सुनीता तायडे या 9 जणांविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.