संशय घेऊन बायकोचा छळ; सासरच्या 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल; लोणार तालुक्यातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बायकोवर संशय घेऊन माहेरहून 50 हजार रुपये आणण्याचा तगादा लावत तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या 8 जणांविद्ध लोणार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी काल, 26 मे रोजी विवाहितेने तक्रार दिली होती. सौ. राखी विलास बच्छिरे यांचा विवाह सोमठाणा (ता. लोणार) येथील विजय बाच्छिरेसोबत 2013 मध्ये झाला होता. त्यांना 5 …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बायकोवर संशय घेऊन माहेरहून 50 हजार रुपये आणण्याचा तगादा लावत तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या 8 जणांविद्ध लोणार पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे. याप्रकरणी काल, 26 मे रोजी विवाहितेने तक्रार दिली होती.

सौ. राखी विलास बच्छिरे यांचा विवाह सोमठाणा (ता. लोणार) येथील विजय बाच्छिरेसोबत 2013 मध्ये झाला होता. त्यांना 5 वर्षांची मुलगी आणी 3 वर्षांचा मुलगा आहे. विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार विवाहितेला नवऱ्याने 5 ते 6 वर्षे चांगले वागवले. नंतर मात्र संशय घेऊन शिविगाळ व मारहाण करण्यात येत होती. सासू, सासरे, दीर, जाऊ ,नणंद हे माहेरहून 50 हजार रुपये आणायला सांगत होते. तुला कामधंदा होत नाही, तू चांगली राहत नाही असे म्हणत विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देत होते.

हा सर्व प्रकार विवाहितेने तिच्या वडिलांना सांगितला तेव्हा तिच्या वडिलांनी जावयाला समजावण्याचा प्रयत्‍न केला असता तुम्ही तुमची मुलगी घेऊन जा व 50 हजार रुपये येतील तेव्हाच घेऊन या, असे म्हणत त्‍याने तिला घराबाहेर काढून दिले. 1 मेपासून विवाहिता किनगाव जट्टू येथे माहेरी आलेली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी पती विलास अशोक बच्छिरे (33), सासरा अशोक बच्छिरे(67), सासू पार्वती अशोक बच्छिरे (60), दीर कैलास अशोक बाच्छिरे (37), जाऊ सीमा कैलास बच्छिरे (30), धन्नु लक्ष्मण बच्छिरे (50), विजय रामकिसन बच्छिरे (40, सर्व रा. सोमठाणा, ता. लोणार) व नणंद ज्योती बबन खैरे (रा. जळगाव ता. जि. जालना) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.