सकाळी प्रातःविधीसाठी गेलेली २२ वर्षांची तरुणी बेपत्ता!; शेगाव तालुक्‍यातील घटना, दिवसभरात जिल्ह्यातून ५ जण गायब

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रूक येथील २२ वर्षीय तरुणी प्रातःविधीसाठी घरातून बाहेर पडली. त्यानंतर ती परतलीच नाही. तिच्या वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दिली आहे. दादाराव सुगदेव सावदेकर (रा. जवळा बुद्रूक) यांनी तक्रार दिली, की त्यांची मुलगी किरण आज, १७ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता तिच्या आईला प्रातःविधीसाठी …
 
सकाळी प्रातःविधीसाठी गेलेली २२ वर्षांची तरुणी बेपत्ता!; शेगाव तालुक्‍यातील घटना, दिवसभरात जिल्ह्यातून ५ जण गायब

शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव तालुक्‍यातील जवळा बुद्रूक येथील २२ वर्षीय तरुणी प्रातःविधीसाठी घरातून बाहेर पडली. त्‍यानंतर ती परतलीच नाही. तिच्‍या वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाणे गाठून मुलगी हरवल्याची तक्रार दिली आहे. दादाराव सुगदेव सावदेकर (रा. जवळा बुद्रूक) यांनी तक्रार दिली, की त्‍यांची मुलगी किरण आज, १७ ऑक्‍टोबरला सकाळी १० वाजता तिच्‍या आईला प्रातःविधीसाठी जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. बराच वेळ होऊनही ती परतली नाही. त्‍यामुळे तिचा शोध गावात, शेजारी व नातेवाइकांकडे घेण्यात आला. मात्र तरीही ती मिळून आली नाही. तपास बिट जमादार अरुण मेटांगे करत आहेत.

नांदुऱ्यातून तरुण बेपत्ता…
नांदुरा येथील २६ वर्षीय शेख शाहरुख शेख निसार (२६) हा घरातून निघून गेल्याची तक्रार नांदुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

बुलडाणा शहरातून तरुणीसह दोघे बेपत्ता
बुलडाणा शहरातून दोन पुरुष आणि एक तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यात कैकाडीपुरा येथील राजू रामकृष्ण मोरे (४०), केशवनगर येथील अमला पुरुषोत्तम लखोटिया (१८) आणि सोळंकी ले आऊट मलकापूर बायपास रोड भागातील रहिवासी रामदास दगडू काळे (५५) यांचा समावेश आहे.