सकाळी शेतात गेलेला शेतकरी समोरील दृश्य पाहून हादरला!

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः शेतातील गोडाऊनमध्ये ठेवलेला हरभरा, गहू, तापडत्री असा एकूण 2 लाख 18 हजार 500 रु माल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नांदुरा तालुक्यातील अवधा येथे आज, 29 मार्चला सकाळी समोर आली. आदल्या दिवशी शेत वासुदेव रामभाऊ दळवी (57, रा. नारखेड ह. मु. दुर्गानगर, नांदुरा) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः शेतातील गोडाऊनमध्ये ठेवलेला हरभरा, गहू, तापडत्री असा एकूण 2 लाख  18 हजार 500 रु माल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नांदुरा तालुक्यातील अवधा येथे आज, 29 मार्चला सकाळी समोर आली. आदल्या दिवशी शेत

वासुदेव रामभाऊ दळवी (57, रा. नारखेड ह. मु. दुर्गानगर, नांदुरा) यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची तक्रार दिली. तक्रारीत म्‍हटले आहे, की माझी अवधा शिवारात गट नं. 57 मध्ये 3 एकर शेती व नारखेड शिवारात गट नं. 190 मध्ये 4 एकर शेती आहे. अवधा शिवारातील शेतीत कांदाचाळ आहे. 28 मार्च रोजी दुपारी 4  वाजता शेतातून घरी नांदुरा येथे आलो. त्यावेळी कांदाचाळमध्ये 60 कट्टे हरभरा (30 क्विंटल) व खुल्ला ठेवलेला हरभरा (वजन 10 क्विंटल), 10 कट्टे गहू (वजन 5 क्विंटल) व 3 ताडपत्री असा एकूण 2 लाख 18 हजार 500 रुपयांचा माल मी जेव्हा दुसऱ्या दिवशी 29 मार्च रोजी सकाळी शेतात गेलो तेव्हा दिसला नाही. चोरांनी चोरून नेला आहे.  या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.