सकाळी 11 नंतरही भाजीपाला, फळे विकणाऱ्या 7 जणांवर बुलडाण्यात कारवाई

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्ण वाढत असल्याने कडक निर्बंध प्रशासनाने लागू केलेले असले तरी, अनेक जण हे निर्बंधही जुमानत नसल्याचे समोर आले आहे. काल, 30 एप्रिलला सकाळी साडेअकराच्या सुमारास सहायक पोलीस निरिक्षक अभिजीत अहिरराव यांनी स्वतः रस्त्यावर उतरून निर्बंध झुगारणाऱ्या फळविक्रेत्या आणि भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई केली. संगम चौक, चिखली रोड, …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोना रुग्‍ण वाढत असल्याने कडक निर्बंध प्रशासनाने लागू केलेले असले तरी, अनेक जण हे निर्बंधही जुमानत नसल्याचे समोर आले आहे. काल, 30 एप्रिलला सकाळी साडेअकराच्‍या सुमारास सहायक पोलीस निरिक्षक अभिजीत अहिरराव यांनी स्‍वतः रस्‍त्‍यावर उतरून निर्बंध झुगारणाऱ्या फळविक्रेत्‍या आणि भाजीपाला विक्रेत्‍यांवर कारवाई केली. संगम चौक, चिखली रोड, त्रिशरण चौकात ही कारवाई करण्यात आली.

शेख युसुफ शेख इस्माइल (43, रा. तेलगूनगर, बुलडाणा) हा संगम चौकात, शेख अकील शेख शब्बीर (38, रा. इक्बाल चौक, बुलडाणा) हा त्रिशरण चौकात तर शेख दानिश  शेय मिसा (20, रा.  सागवन) हा एकतानगरात भारतीय स्टेट बँकेसमोर, चिखली रोडवर फळे विकत होता. हरिदास विश्वनाथ जाधव (36, रा. कोलवड) हा चिंचोले चौकात, हरिदास विश्वनाथ जाधव (36, रा. कोलवड) हा चिखली रोडवर स्‍टेट बँक चौकात तर गणेश धनराज डोइफोडे (35, रा. शिवशंकरनगर, बुलडाणा) आणि शरद  मदन डूकरे (53, रा. इतापे ले आउट, बुलडाणा) हे दोघेही भारतीय स्टेट बँकेसमोर भाजीपाला विकत होते. सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत अत्यावश्यक वस्‍तू विकण्याची परवानगी आहे. तरीही हे सर्व जण 11 वाजेनंतरही दुकान मांडून होते. त्‍यावरून त्‍यांच्‍याविरुद्ध संसर्ग पसरविण्याची घातक कृती केल्‍याचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक अभीजित अहिरराव करत आहेत.