सक्तीच्‍या करवसुलीविरोधात चिखलीत शिवसेना आक्रमक!

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नगरपरिषदेच्या सक्तीच्या करवसुलीविरोधात शिवसेना दंड थोपटून मैदानात उतरली आहे. सक्तीची करवसुली बंद करा आणि करावर लावण्यात येणार्या व्याजाची आकारणी रद्द करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना व युवा सेनेने मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे. पंतप्रधान घरकल योजनेचे उर्वरित हप्ते लाभार्थ्यांना तत्काळ देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात केली आहे. यासंदर्भात दिलेल्या …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)  ः नगरपरिषदेच्‍या सक्‍तीच्‍या करवसुलीविरोधात शिवसेना दंड थोपटून मैदानात उतरली आहे. सक्तीची करवसुली बंद करा आणि करावर लावण्यात येणार्‍या व्याजाची आकारणी रद्द करा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना व युवा सेनेने मुख्याधिकाऱ्यांना दिला आहे.

पंतप्रधान घरकल योजनेचे उर्वरित हप्ते लाभार्थ्यांना तत्काळ देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात केली आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्‍हटले आहे, शहरातील लोकांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होत आहे. असे असताना चिखली नगर परिषदेने सक्तीची कर वसुली मोहीम सुरू केली आहे. निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहर प्रमुख श्रीराम झोरे, युवा सेना तालुकाध्यक्ष नंदू कर्‍हाडे, शिवसेना शहर संघटक प्रितम गैची, मनोज वाघमारे, बंटी कपूर, शेख बबलु, रवी पेटकर, आनंद गैची, दीपक सोनवाल, पिंटू गायकवाड, राजेश झोरे, गोलू झोरे, समाधान जाधव, शाम शिंगणे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.