… तर महावितरणच्‍या अधिकाऱ्यांना काळे फासू; मनसेचा देऊळगाव राजात इशारा

देउळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अव्वाच्या सव्वा आलेली वीजबिले भरणे सामान्यांना अशक्य झाले आहे. अशातच आता महावितरणने विज जोडणी खंडित करणे सुरू केले असून, ही कार्यवाही तातडीने थांबवावी अन्यथा महावितरणच्या अधिकाऱ्यांना काळे फासू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देऊळगाव राजात दिला आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांचे वीज बील माफ करायचे सोडून …
 

देउळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अव्वाच्‍या सव्वा आलेली वीजबिले भरणे सामान्‍यांना अशक्‍य झाले आहे. अशातच आता महावितरणने विज जोडणी खंडित करणे सुरू केले असून, ही कार्यवाही तातडीने थांबवावी अन्यथा महावितरणच्‍या अधिकाऱ्यांना काळे फासू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देऊळगाव राजात दिला आहे. तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांचे वीज बील माफ करायचे सोडून महावितरण शेतकरी, सामान्‍य नागरिकांना अधिक संकटात टाकत आहेत. ही कार्यवाही थांबवावी अन्यथा अन्यथा मनसे स्टाईल आधिकाऱ्यांच्‍या तोंडाला काळे फासण्याचे आंदोलन जिल्हाभर राबवण्यात येईल , असे निवेदनात म्‍हटले आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष बाळराजे देशमुख, तालुकाध्यक्ष राजू मांन्टे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सी, शहर अध्यक्ष नईम सय्यद, बंडू डोळस, शेयजाद भाई, कैलास पवार आदी कार्यकर्त्यांच्‍या सह्या आहेत.