सचिन वाझेंची डायरी एनआयएच्या हाती?

कोडवर्डमधील नावे,नंबरमधून उलगडणार स्फोटक माहितीमुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच एनआए करत आहे.एनआयएने याप्रकरणी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या घरून एक महत्वाची डायरी जप्त केली आहे.ही डायरी राज्याच्या राजकारणात अनेक धक्कादायक बाबींचे केंद्र ठरेल, असे म्हटले जात आहे. डायरीत कोडवर्डमध्ये अनेक नंबर्स व नावे लिहिली …
 

कोडवर्डमधील नावे,नंबरमधून उलगडणार स्फोटक माहिती
मुंबई :
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थातच एनआए करत आहे.एनआयएने याप्रकरणी निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेच्या घरून एक महत्वाची डायरी जप्त केली आहे.ही डायरी राज्याच्या राजकारणात अनेक धक्कादायक बाबींचे केंद्र ठरेल, असे म्हटले जात आहे. डायरीत कोडवर्डमध्ये अनेक नंबर्स व नावे लिहिली आहेत. त्याचा अर्थ लावण्यात व उलगडा करण्यात एनआयएकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे कोड क्रमांक व नावांच्यापुढे काही रकमाही लिहिल्या आहेत. त्याचा संदर्भत १०० कोटींच्या गृहमंत्र्यांच्या कथित खंडणीप्रकरणाशी आहे का? याचा तपास एनआयकडून केला जात आहे.माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रेस्टॉरंट, बार, पब आणि हुक्का पार्लर येथून सचिन वाझेने नेमकी किती रक्कम वसूल केली याचा उल्लेख डायरीत असण्याची शक्यता आहे. त्याचा उल्लेख परमबीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भातील खंडणीचा आरोप करणार्‍या लेटरबॉम्बमध्ये असण्याची शक्यता आहे. दरम्यान एनआयएच्या पथकोन दमण येथून एक कार जप्त केली असून सचिन वाझे ती कार वापरत होता,असे समजते.