सण, उत्‍सव, महापुरुषांची जयंती नियमांच्‍या ‘चौकटीतच!’… बुलडाणेकरांना पोलिसांनी केले हे आवाहन…; शांतता समितीची बैठक

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे संकट अधिक वाढू नये यासाठी सर्व समाजबांधवांनी दक्षता घेण्याची गरज असून, आगामी काळात महापुरुषांची जयंती, सण, उत्सव साजरे करताना सरकारने ठरवून दिलेले कोरोनाविषयक नियम पाळण्याची गरज आहे, असे आवाहन बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आज, 10 एप्रिलला सकाळी 11 ला झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले. चालू …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाचे संकट अधिक वाढू नये यासाठी सर्व समाजबांधवांनी दक्षता घेण्याची गरज असून, आगामी काळात महापुरुषांची जयंती, सण, उत्‍सव साजरे करताना सरकारने ठरवून दिलेले कोरोनाविषयक नियम पाळण्याची गरज आहे, असे आवाहन बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आज, 10 एप्रिलला सकाळी 11 ला झालेल्या शांतता समितीच्‍या बैठकीत करण्यात आले.

चालू महिन्यात महात्‍मा फुले जयंती, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, हनुमान जयंती, मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना, महावीर जयंती आदी सण, उत्‍सव, महापुरुषांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर शांतता समिती बैठक झाली. बैठकीत कोरोनाचा प्रकोप लक्षात घेता काही नियम घालून देण्यात आले. बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, नायब तहसीलदार श्री. सानप, शहर पोलीस ठाणेदार प्रदीप साळुंखे, दादाराव गायकवाड, अनिल आराख, बाळू ठाकरे, जीवन गवई, चेतन घेवंदे, श्रीकांत जाधव, आशिष खरात, प्रभाकर वाघमारे, दिगंबर साठे, सुमित सरदार, किरण गायकवाड, दिलीप जाधव, सुमित गायकवाड, मोईन काझी, बबलू कुरेशी, मो.दानिश अजहद, जाकीर कुरेशी, जामीर शेख, हाफिज कुरेशी यांच्‍यासह पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्‍थिती होती.

बैठकीत पोलिसांनी केलेले आवाहन…

  • महापुरुषांच्‍या जयंतीनिमित्त रॅली व गर्दी करणारे कार्यक्रम घेतले जाणार नाहीत.
  • सुरक्षित अंतर ठेवून, पुरेशी खबरदारी घेऊन रक्‍तदान शिबिरे आयोजित करावीत.
  • रमजान महिन्यात गर्दी करू नये. सामूहिक नमाज अदा होणार नाही. आपापल्या घरून नमाज पठण करावे.
  • फटाके फोडून प्रदूषणास कारणीभूत ठरू नये.
  • एकावेळी पाच लोक जाऊन महापुरुषांना अभिवादन करावे, असे आवाहन यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे बोलत होते.