सतर्क राहा… जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस पावसाची शक्यता

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात उद्या 16 फेब्रुवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.16 फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. 17 व 18 फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची …
 

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात उद्या 16 फेब्रुवारीपासून 18 फेब्रुवारीपर्यंत पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
16 फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. 17 व 18 फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची तसेच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी वर्तविली आहे. शेतकरी बंधूंंनी कापणी करून शेतात ठेवलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी स्वत:ची व पशुधनाची यथायोग्य काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र कृषी विज्ञान केंद्र बुलडाणा यांनी केले आहे.