सत्य, शुद्ध आणि सुंदरतेचा मिलाप ओम आनंद ज्वेलर्स

सत्यता, सोने- चांदीची शुध्दता आणि ग्राहकांचा अतूट विश्वास हा आमच्या प्रतिष्ठानच्या यशाचा पाया आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद अन् देवाचे पाठबळ या बळावर प्रगतीचा पल्ला गाठला आहे… या शब्दांत बुलडाणा शहरातील सराफा लाईनमधील ओम आनंद ज्वेलर्सचे मालक रतनलाल निरंजनलाल वर्मा यांनी आपल्या यशाचे रहस्य सांगितले. हे सांगताना आज वय 66 वर्षे असलेल्या रतनलालजींच्या चेहर्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून …
 
सत्य, शुद्ध आणि सुंदरतेचा मिलाप ओम आनंद ज्वेलर्स

सत्यता, सोने- चांदीची शुध्दता आणि ग्राहकांचा अतूट विश्‍वास हा आमच्या प्रतिष्ठानच्या यशाचा पाया आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद अन् देवाचे पाठबळ या बळावर प्रगतीचा पल्ला गाठला आहे… या शब्दांत बुलडाणा शहरातील सराफा लाईनमधील ओम आनंद ज्वेलर्सचे मालक रतनलाल निरंजनलाल वर्मा यांनी आपल्या यशाचे रहस्य सांगितले. हे सांगताना आज वय 66 वर्षे असलेल्या रतनलालजींच्या चेहर्‍यावरील आनंद स्पष्टपणे दिसून आला…

सत्य, शुद्ध आणि सुंदरतेचा मिलाप ओम आनंद ज्वेलर्स

ओम आनंद ज्वेलर्सचे संचालक रतनलालजी व त्यांची दोन कर्तबगार मुले अर्थात ‘पार्टनर’ दीपक वर्मा, आनंद वर्मा यांच्या व्यवसायाची हीच पद्धत आहे. 90 वर्षांपासून हा त्यांचा पिढीजात धंदा. आज शहरासह जिल्ह्यातील अग्रगण्य पेढी असलेल्या आनंद ज्वेलर्सची नवीन पिढी समर्थपणे व्यवसायाची धुरा सांभाळणारी निघाली आहे. सोन्या- चांदीचे सर्व दागिने याठिकाणी उपलब्ध आहेत. पिढीजात व्यवसाय असल्याने त्यांना या धंद्यातील सर्व बारकाईने माहित आहेत. नवीन पध्दती, डिझाइन याचा गाढा अभ्यास झालेला आहे. सत्य, शुद्ध, व सुंदर या मौलिक मंत्रावर त्यांनी सन 1983 मध्ये व्यवसाय सुरू केला. आजही या त्रिसूत्रीवर त्यांचा व्यवसाय सुरू आहे. यामुळे हजारो शहरी व ग्रामीण ग्राहकांचे हे आवडीचे व पसंतीचे दुकान ठरले आहे. लग्नाचे दागिने असो वा सणावाराची खरेदी असो सोन्या -चांदीच्या दागिन्यांसाठी ग्राहकांची पहिली पसंती आनंद ज्वेलर्स होय. या धंद्यात यश, पैसा आहे पण अडचणी देखील खूप आहेत. मुळात व्यवसायाला मोठे भांडवल लागते. त्याची जुळवाजुळव ही मोठीच अडचण आहे. दागिन्यांचे भरमसाठ प्रकार असल्याने ग्राहकांचे समाधान करणे कसरतच ठरते. पण आजवर आलेला प्रत्येक ग्राहक समाधानी होऊनच परतल्याचे श्री. वर्मा अभिमानाने सांगतात. अनेकदा चोर्‍यांची भिती असते. ग्राहकांच्या वेषात येणार्‍या चोरट्यांना रोखणे हे आव्हान ठरते. कायदे कडक आहेत. चोरट्याने या दुकानात दागिने विकले असे सांगितले तरी त्यावर विश्‍वास ठेवला जातो. त्यामुळे नियम कायदे थोडे शिथील करण्यात सरकारने लक्ष देण्याची गरज असल्याचे श्री. वर्मा यांनी सांगितले. आकारण्यात येणारा जीएसटी कमी करणे किंवा 1 टक्का करणे आवश्यक ठरते. भविष्यात व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी मोठी जागा घेतली असून, त्यात सोने-चांदी समवेत हिर्‍यांची विक्री करण्याचे देखील नियोजन आहे. अविस्मरणीय क्षण एके दिवशी एक आजीबाई भेटल्या. त्यांनी मिठी मारून ‘अरे किती दिवसांनी भेटलास, कसा आहे‘ असे विचारले. यावेळी त्यांच्या व अन्य ग्राहकांच्या चेहर्‍यावरील आनंद जीवनात अविस्मरणीय क्षण ठरल्याचे श्री. वर्मा यांनी सांगितले.