सदाभाऊ खोत यांचा बुलडाणा लाइव्हशी संवाद… म्‍हणाले, नवरी पळून गेल्याने मंडप ओस पडलाय, योग्य वेळ आल्यावर बँड वाजवणार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तिन्ही पक्ष दरोडेखोर आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर दरोडा घालून लुटता येणार नाही म्हणून तीन दरोडेखोरांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. आता त्यांनी शेतकऱ्यांना व जनतेला लुटण्याचा धंदा सुरू केला आहे, असा घणाघात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत …
 
सदाभाऊ खोत यांचा बुलडाणा लाइव्हशी संवाद… म्‍हणाले, नवरी पळून गेल्याने मंडप ओस पडलाय, योग्य वेळ आल्यावर बँड वाजवणार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस हे तिन्ही पक्ष दरोडेखोर आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर दरोडा घालून लुटता येणार नाही म्हणून तीन दरोडेखोरांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. आता त्यांनी शेतकऱ्यांना व जनतेला लुटण्याचा धंदा सुरू केला आहे, असा घणाघात रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाण्यात केला. राणा चंदन यांच्या परिवाराच्या सांत्वन भेटीसाठी व अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी श्री. खोत आज, ६ ऑक्टोबरला बुलडाण्यात आले होते. यावेळी बुलडाणा लाइव्हशी त्‍यांनी संवाद साधला.

सदाभाऊ खाते म्हणाले, की यंदा कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ,मराठवाडा, खानदेश या सर्वच प्रांतात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी खचला आहे. मात्र लुटण्यात व्यस्त असल्याने सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या ५ दिवसांत ६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, की सरसकट अतिवृष्टी जाहीर करून सरकारने तातडीने मदत घ्यावी. शेतकऱ्यांचे चालू पीक कर्ज माफ करावे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे. त्यांचे वीज कनेक्शन तोडू नये. पण असा निर्णय आघाडी सरकार घेणार नाही. कारण मुळात ते दरोडेखोर असल्याने कमी काळात तिजोरी कशी लुटता येईल याचाच विचार आघाडी सरकार सतत करत असते. हे राज्य दुर्योधनाचे आहे. त्यांचे गुरु पवारांच्याआदेशाने हे सर्व चाललंय, असंही ते म्हणाले.

महाराष्टाच्या जनतेने युतीवर विश्वास दाखवला होता. बहुमताचे सरकार दिले मात्र साखरपुडा, हळद लागण्याच्या कार्यक्रम झाल्यानंतर नवरी लग्नमंडपातून पळून गेली. त्यामुळे आमचा मंडप सध्या ओस पडलाय. मात्र आम्ही मंडपातच आहोत. मंडप सजवलेला आहे. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही बँड वाजवून अक्षता टाकू, असेही सदाभाऊ म्हणाले. चिखली तालुक्यातही आमखेड पाझर तलावाला सदाभाऊ खोत यांनी भेट दिली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.