सद्दाम हुसेनचे पुस्तक वाचून सासरच्या मंडळींना दिले जेवणातून विष

सासू व भावजयीचा मृत्यू; पत्नी कोमात; दिल्लीत बड्या उद्योजकाला अटकनवी दिल्ली : हायप्रोफाईल व्यक्ती गुन्हेगारी कारवाया करण्याच्या कल्पना सोशल मीडिया, इंटरनेटवरून घेतात हे अनेकदा दिसून आले आहे. परंतु दिल्लीतील एका उद्योजकाने सासरवाडीच्या लोकांना जेवणातून विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात त्याची सासू व पत्नीच्या भावाच्या बायकोचा लगेच मृत्यू झाला. तर पत्नी महिन्याभरापासून कोमामध्ये असून …
 

सासू व भावजयीचा मृत्यू; पत्नी कोमात; दिल्लीत बड्या उद्योजकाला अटक
नवी दिल्ली : हायप्रोफाईल व्यक्ती गुन्हेगारी कारवाया करण्याच्या कल्पना सोशल मीडिया, इंटरनेटवरून घेतात हे अनेकदा दिसून आले आहे. परंतु दिल्लीतील एका उद्योजकाने सासरवाडीच्या लोकांना जेवणातून विष देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात त्याची सासू व पत्नीच्या भावाच्या बायकोचा लगेच मृत्यू झाला. तर पत्नी महिन्याभरापासून कोमामध्ये असून मृत्यूशी झुंज देत आहे. विशेष म्हणजे त्याने जेवणातून विष देण्याची कल्पना हुकुमशहा सद्दाम हुसनेचे पुस्तक वाचून सुचल्याचे व त्याआधारे कट केल्याचे पुरावे पोलिसांच्य हाती लागले आहेत.पोलिसांनी याप्रकरणी उद्योजकाला अटक केली आहे.
वरूण अरोरा असे अटक करण्यात आलेल्या उद्योजकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात होमिओपॅथी औषधांचे उत्पादक देवेंद्र मोहन शर्मा (वय ६२) यांनी २१ मार्चरोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा जावई वरूण अरोरा याने सासुरवाडीच्या मंडळींना जेवणातून विष दिले. वरूण याने मासे बनविले होते.त्यात त्याने थॅलियम नावाचे घातक विष मिसळले होते. त्यामुळे देवेंद्र शर्मा यांची पत्नी व सुनेचा तात्काळ मृत्यू झाला. तर वरूणची पत्नी कोमात असून मृत्यूशी झुंज देत आहे. वरूण याने त्याच्या जुळ्या मुलांनाही मासे वाढले. पण ते त्यांनी खाल्ले नाहीत. त्यामुळे ते बचावले. शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी वरूण अरोराला अटक केली. त्याची झाडझडती घेतल असता त्याच्या लॅपटॉपमधून महत्वाची माहिती मिळाली. त्यात त्याने थेलियम विषाशी संबंधित अनेक वेब पेज सर्च केल्याचे आढळून आले. सद्दाम हुसेन यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी याच विषाचा वापर केला होता. हे वाचून वरूण अरोरानेही तसाच कट केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.