समाज प्रबोधनात पत्रकारांचा मोठा वाटा ः ठाणेदार जितेंद्र आडोळे

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोलीस समाजातील एक दुवा आहे. पोलीस आम जनतेचं रक्षण करतो. पत्रकार अन्यायग्रस्तांचे प्रश्न शासनदरबारी मांडतो. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचे समाज प्रबोधनात मोठे योगदान असल्याचे मत ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी व्यक्त केले. साखरखेर्डा पोलीस ठाण्यात 6 जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार गौरव सोहळ्यात ते बोलत होते. …
 

मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पोलीस समाजातील एक दुवा आहे. पोलीस आम जनतेचं रक्षण करतो. पत्रकार अन्यायग्रस्तांचे प्रश्‍न शासनदरबारी मांडतो. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचे समाज प्रबोधनात मोठे योगदान असल्याचे मत ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी व्यक्त केले. साखरखेर्डा पोलीस ठाण्यात 6 जानेवारीला पत्रकार दिनानिमित्त आयोजित पत्रकार गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार भगवान साळवे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी श्री. साळवे यांच्यासह बुलडाणा लाइव्हचे प्रतिनिधी अमोल साळवे, अशोक इंगळे, संतोष गाडेकर, आमीनशहा, मनोज पर्‍हाड, श्री. पांचाळ, वसीम शेख, गजानन इंगळे, सचिन खंडारे आदींचा भेटवस्तू देऊन ठाणेदारांनी गौरव केला. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक राणे व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहेकाँ नारायण गीते यांनी केले. आभार पोहेकाँ सुरतसिंग इंगळे यांनी मानले.