सरकारी कापूस खरेदीकडे बळीराजाची पाठ; खासगी केंद्रांत दर वाढल्याने वाढली गर्दी

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यात चालू हंगामात पणन महासंघाने तालुक्यासाठी तीन कापूस खरेदी केंद्र सुरू केले. शासकीय हमी भाव हा 5700 रुपये प्रती क्विंटल आहे. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव वाढल्याने देऊळगाव राजा बाजार समितीत भरविण्यात येणार्या खासगी कापूस बाजारात शेतकर्यांच्या कापसाला 5800 से 5850 भाव मिळत …
 

देऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देऊळगाव राजा तालुक्यात चालू हंगामात पणन महासंघाने तालुक्यासाठी तीन कापूस खरेदी केंद्र सुरू केले. शासकीय हमी भाव हा 5700 रुपये प्रती क्विंटल आहे. मात्र सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव वाढल्याने देऊळगाव राजा बाजार समितीत भरविण्यात येणार्‍या खासगी कापूस बाजारात शेतकर्‍यांच्या कापसाला 5800 से 5850 भाव मिळत आहे. (काल हा खासगी 6000 एवढा भाव मिळाला आहे.) त्यामुळे शेतकरी सरकारी केंद्राकडे जाण्याऐवजी खासगी केंद्रात कापूस घेऊन गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.
आतापर्यंत 5754 शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी फक्त 2 हजार शेतकर्‍यांनी शासकीय केंद्रावर आपला कापूस विक्रीसाठी आणला आहे. शासकीय केंद्रातील पैसे मिळण्यासाठी एक महिन्याची वाट पाहावी लागते. दुसरीकडे खासगी बाजारपेठेत चांगला भाव मिळत असल्यामुळे आणि पैसही झटपट मिळत असल्याने शेतकरी राजा आपला कापूस हा खासगी व्यापार्‍यांना देत आहेत. देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे जालना जिल्ह्यातील जालना, जाफराबाद, टेंभुर्णी भागातील शेतकरीही कापूस घेऊन देऊळगाव राजा गाठत आहेत.