सरकारी जागेवर अतिक्रमण भोवले; हसीनाबी गवळी यांचे नगरसेवक पद रद्द

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरकारी जागेवरचे अतिक्रमण नगरसेवक हसीनाबी कासम गवळी यांना भोवले असून, पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे नगरसेवक पद काढून घेतले आहे. हसीनाबी माजी नगराध्यक्ष असून, सध्याचे नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या अतिक्रमणाची तक्रार विकास जोशी, ओमप्रकाश सौभागे या दोन शिवसेना नगरसेवकांसह अहमदशाह सबदर शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली …
 
सरकारी जागेवर अतिक्रमण भोवले; हसीनाबी गवळी यांचे नगरसेवक पद रद्द

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरकारी जागेवरचे अतिक्रमण नगरसेवक हसीनाबी कासम गवळी यांना भोवले असून, पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी त्‍यांचे नगरसेवक पद काढून घेतले आहे.

हसीनाबी माजी नगराध्यक्ष असून, सध्याचे नगराध्यक्ष कासम गवळी यांच्या पत्‍नी आहेत. त्‍यांच्‍या अतिक्रमणाची तक्रार विकास जोशी, ओमप्रकाश सौभागे या दोन शिवसेना नगरसेवकांसह अहमदशाह सबदर शाह यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. शहीद अब्‍दुल हमीद बहुउद्देशीय संस्‍थेने सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने त्‍यांना नगरसेवकपदी आता राहता येणार नाही, असा निकाल जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. याच प्रकरणात नगराध्यक्ष कासम गवळी हेही दोषी आहेत. मात्र ते नगराध्यक्ष असल्याने त्‍यांच्‍यावरील कारवाईचे प्रकरण राज्‍य शासनाकडे निर्णयासाठी राखीव आहे.