सरपंचपुत्राचा ग्रामपंचायत कार्यालयात धिंगाणा; ग्रामसेवकाला शिविगाळ, धक्काबुक्की; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिला सरपंचांच्या पुत्राने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धिंगाणा केला. ग्रामसेवकाला शिविगाळ आणि धक्काबुक्की केली. ही घटना गोद्री (ता. चिखली) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज, १० ऑगस्टला सकाळी १० च्या सुमारास घडली. ग्रामसेवकांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सरपंचपुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोद्री येथे सौ. सखुबाई भानुदास दहीकर या १० फेब्रुवारी …
 
सरपंचपुत्राचा ग्रामपंचायत कार्यालयात धिंगाणा; ग्रामसेवकाला शिविगाळ, धक्काबुक्की; चिखली तालुक्यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः महिला सरपंचांच्‍या पुत्राने ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धिंगाणा केला. ग्रामसेवकाला शिविगाळ आणि धक्काबुक्की केली. ही घटना गोद्री (ता. चिखली) येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज, १० ऑगस्टला सकाळी १० च्‍या सुमारास घडली. ग्रामसेवकांनी चिखली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सरपंचपुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोद्री येथे सौ. सखुबाई भानुदास दहीकर या १० फेब्रुवारी २०२१ पासून सरपंच आहेत. आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक भगवान कुंडलिक परिहार कामकाज करत होते. त्यावेळी सरपंचांचा मुलगा प्रभाकर (२५) ग्रामपंचायत कार्यालयात आला. ग्रामसेवकाला कामकाज करण्यापासून रोखले व शिविगाळ केली. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच भरत जोगदंडे, अशोक प्रतापसिंग सुरडकर व ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते, असे ग्रामसेवकांनी तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून प्रभाकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.