सरपंच निवडणुकीसाठी जाणार्‍या महिला ग्रामपंचायत सदस्यास पोलीस कर्मचार्‍याची मारहाण; एसपींकडे तक्रार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या नवनियुक्त महिला ग्रामपंचायत सदस्यास कर्तव्यावर असणार्या पोलीस कर्मचार्याने मारहाण केल्याची तक्रार या महिलेच्या दिराने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या मोहोगाव येथे काल सरपंच, उपसरपंच निवडीवरून राडा झाला होता. मोहेगाव, खडकी आणि खैरखेड या गावाची गटग्रामपंचायत असलेल्या सरपंचपदाच्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या नवनियुक्त महिला ग्रामपंचायत सदस्यास कर्तव्यावर असणार्‍या पोलीस कर्मचार्‍याने मारहाण केल्याची तक्रार या महिलेच्या दिराने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या मोहोगाव येथे काल सरपंच, उपसरपंच निवडीवरून राडा झाला होता. मोहेगाव, खडकी आणि खैरखेड या गावाची गटग्रामपंचायत असलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी नवनिर्वाचित सदस्य एका वाहनातून ग्रामपंचायत कार्यालयात जात असताना जमावाने वाहनावर दगडफेक केली होती. त्यानंतर अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले होते. दरम्यान यावेळी तिथे उपस्थित असलेले पोलीस कर्मचारी नरोटे यांनी संगीता बळीराम चव्हाण या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करून ग्रामपंचायत कार्यालयात जाण्यापासून रोखल्याचा दावा महिलेचे दीर लक्ष्मण चव्हाण यांनी तक्रारीत केला आहे. यासंदर्भात बोराखेडी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्‍यांच्यासह 8 जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. ही घटना घडल्यानंतर बोराखेडी पोलिसांनी तक्रार स्वीकारली नसल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.