सरपंच परिषदेच्‍या जिल्हा समन्वयकपदी हिवरा गडलिंग सरपंच सौ. पूनम अनंता खरात, बिरसिंगपूरचे उपसरपंच राजू मुळे

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सरपंच परिषदेच्या जिल्हा समन्वयकपदी हिवरा गडलिंगच्या (ता. सिंदखेड राजा) सरपंच सौ. पूनम अनंता खरात आणि बिरसिंगपूरचे उपसरपंच (ता. बुलडाणा) राजू फकीरबा मुळे यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय किनगाव राजाच्या (ता. सिंदखेड राजा) सौ. सीमा काळुसे, गुगळीचे (ता. सिंदखेड राजा) विजय आसने यांचीही समन्वयकपदी नियुक्ती झाली आहे. विदर्भ समन्वयक म्हणून श्याम …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सरपंच परिषदेच्‍या जिल्हा समन्वयकपदी हिवरा गडलिंगच्‍या (ता. सिंदखेड राजा) सरपंच सौ. पूनम अनंता खरात आणि बिरसिंगपूरचे उपसरपंच (ता. बुलडाणा) राजू फकीरबा मुळे यांची नियुक्‍ती झाली आहे. याशिवाय किनगाव राजाच्‍या (ता. सिंदखेड राजा) सौ. सीमा काळुसे, गुगळीचे (ता. सिंदखेड राजा) विजय आसने यांचीही समन्वयकपदी नियुक्‍ती झाली आहे. विदर्भ समन्वयक म्‍हणून श्याम उर्फ विनोद जयस्वाल यांची नियुक्‍ती झाली आहे. सरपंच परिषद मुंबईचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, महिला आघाडी अध्यक्ष राणीताई पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गिते, प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांनी या नियुक्‍त्या एका पत्राद्वारे केल्या.