सर्पदंशाचे प्रमाण वाढले; जिल्हा रुग्‍णालयात रोज चार-पाच रुग्ण दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पावसाळा सुरू होताच जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. शेतात काम करताना पिकांच्या व गवताच्या उंचीमुळे साप दिसत नाहीत. त्यांच्यावर पाय पडल्यास साप चावा घेतो. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दिवसाला सरासरी चार ते पाच जणांना विषबाधा झाल्यामुळे भरती करण्यात येते. गेल्या १० दिवसांत ३५ पेक्षा अधिक जणांना सर्पदंश झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात …
 
सर्पदंशाचे प्रमाण वाढले; जिल्हा रुग्‍णालयात रोज चार-पाच रुग्ण दाखल

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पावसाळा सुरू होताच जिल्ह्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढले आहे. शेतात काम करताना पिकांच्या व गवताच्या उंचीमुळे साप दिसत नाहीत. त्यांच्‍यावर पाय पडल्यास साप चावा घेतो. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दिवसाला सरासरी चार ते पाच जणांना विषबाधा झाल्यामुळे भरती करण्यात येते. गेल्या १० दिवसांत ३५ पेक्षा अधिक जणांना सर्पदंश झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याशिवाय अनेक खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा सर्पदंश झाल्याने दाखल रुग्णांची संख्या जास्त आहे.

सध्या घोणस आणि कोब्रा(नाग) या दोन जातींच्या सापांचा प्रजनन काळ आहे. सापांचा अंड्यातून पिल्लं बाहेर येण्याचा हा काळ असल्याने शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात घोणस जातीच्या सापाला परोड्या म्हणतात. त्याच्या संथ हालचालीमुळे तो बिनविषारी असल्याचे लोक समजतात. मात्र हा साप प्रचंड विषारी असतो. शेतात फवारणी करताना, गवत कापताना पायात गुडघ्यापर्यंत चांगले बूट घालावेत. अडगळीत हात टाकण्यापूर्वी जागा सुरक्षित असल्याची खात्री करावी. सर्पदंश झालाच तर मांत्रिक आणि मंदिरावर न जाता सरळ हॉस्पिटल गाठावे, अशी माहिती सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली.