सर्व पत्रकार, कॅमेरामनना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा; आमदार श्वेताताई महाले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी चिखली विधानसभेच्या भाजप आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आज केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात सौ. श्वेता महाले म्हणतात की, देशातील सुमारे १२ राज्यांत प्रसिद्धी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याची मागणी चिखली विधानसभेच्या भाजप आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून आज केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात सौ. श्वेता महाले म्हणतात की, देशातील सुमारे १२ राज्यांत प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाइन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन सुद्धा केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल, असे आमदार सौ. महाले पाटील यांनी पत्रात म्‍हटले आहे.