सवडद येथून मुलाचे अपहरण; जिल्ह्यातून दोन तरुणींसह वृद्ध बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सवडद (ता. सिंदखेड राजा) येथून 17 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्या वडिलांनी या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांत काल तक्रार दिली आहे. विनायक परमेश्वर धोंडगे (17) असे अपहृत मुलाचे नाव आहे. त्याचा शेतात, गावात सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आलेला नाही. त्याला कुणीतरी पळवून नेले असल्याचा …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सवडद (ता. सिंदखेड राजा) येथून 17 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्‍याचा प्रकार समोर आला आहे. त्‍याच्‍या वडिलांनी या प्रकरणी साखरखेर्डा पोलिसांत काल तक्रार दिली आहे. विनायक परमेश्वर धोंडगे (17) असे अपहृत मुलाचे नाव आहे. त्‍याचा शेतात, गावात सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र तो मिळून आलेला नाही. त्‍याला कुणीतरी पळवून नेले असल्याचा संशय त्‍याचे वडील परमेश्वर धोंडगे यांनी तक्रारीत व्‍यक्‍त केला आहे.

दोन तरुणी, एक वृद्ध बेपत्ता
खामगाव शहरातून दोन तरुणी बेपत्ता झाल्या असून, घाटपुरी रोडवरील मंगलमूर्तीनगरातून 27 वर्षीय शिवानी दिलीपराव काळे (27), रावणटेकडी भागातून 23 वर्षीय सौ. सविता रवि लांडगे या दोघी घरात कुणाला काही न सांगता निघून गेल्या आहेत. त्‍या हरवल्याची तक्रार अनुक्रमे खामगाव शहर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याशिवाय मेहकर तालुक्‍यातील पिंप्री माळी येथून भास्‍कर नामदेव इंगळे (62) घरातून निघून गेले आहेत. ते हरविल्याची तक्रार मेहकर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अनिल इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बी-बियाणे आणण्यासाठी जात आहे असे सांगून भास्‍कर इंगळे गेले, ते परतलेच नाहीत. घरच्यांनी नातेवाइकांना फोनवर चौकशी करून विचारले असता आमच्याकडे आले नाहीत. त्यांचा शोध केला असता ते मिळाले नाहीत. त्यांच्या अंगावर सफारी ड्रेस घातलेला आहे. कोणाला कुठे आढळल्यास अनिल इंगळे यांच्याशी संपर्क करावा असे 8668258386 या नंबर वर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.