सहायक वनसंरक्षक, वनकर्मचाऱ्यांवर पुन्हा मेंढपाळांचा हल्ला; शासकीय गाडीच्या काचा फोडल्या, ज्ञानगंगा अभयारण्यातील दुसऱ्यांदा प्रकार

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा तालुक्यात वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मेंढपाळांनी हल्ला केल्याचे प्रकरण ताजे असतानाच खामगाव तालुक्यातही तशीच घटना समोर आली आहे. गस्तीवरील वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करून शासकीय गाडीच्या काचा फोडून जप्त केलेल्या मुद्देमालासहित अटकेतील आरोपी पळविण्यात आले. ही घटना काल, १६ ऑगस्ट रोजी दुपारी मांडणी शिवारात (ता. खामगाव) घडली. हिवरखेड पोलीस ठाण्यात …
 
सहायक वनसंरक्षक, वनकर्मचाऱ्यांवर पुन्हा मेंढपाळांचा हल्ला; शासकीय गाडीच्या काचा फोडल्या, ज्ञानगंगा अभयारण्यातील दुसऱ्यांदा प्रकार

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा तालुक्यात वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मेंढपाळांनी हल्ला केल्याचे प्रकरण ताजे असतानाच खामगाव तालुक्यातही तशीच घटना समोर आली आहे. गस्तीवरील वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करून शासकीय गाडीच्या काचा फोडून जप्त केलेल्‍या मुद्देमालासहित अटकेतील आरोपी पळविण्यात आले. ही घटना काल, १६ ऑगस्ट रोजी दुपारी मांडणी शिवारात (ता. खामगाव) घडली.

हिवरखेड पोलीस ठाण्यात सहाय्यक वनसंरक्षक रणजित रघुवीर गायकवाड यांनी याप्रकरणाची तक्रार दिली. काल दुपारी गायकवाड हे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह मांडणी शिवारात गस्तीवर होते. त्यावेळी परिसरात अवैध वनचराई होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तेव्हा अधिकाऱ्यांनी मेंढ्या जप्तीची कारवाई सुरू केली. त्यावेळी मेंढ्याच्या कळपाचा मालक मोतीराम रतन टिळे याने आरडाओरड करून त्याच्या इतर आठ सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावले. जप्त केलेल्या मेंढ्या पळवून नेल्या.

यातील दोघांना वनविभागाच्या गाडीत घेऊन जात असताना मेंढपाळांनी पुन्हा शासकीय गाडीवर हल्ला करून वाहनाच्या काचा फोडल्या. सहायक वनसंरक्षक गायकवाड व वनविभागाचे संतोष गिरनारे यांना मारहाण करून करून पकडण्यात आलेल्या आरोपींनाही पळवून घेऊन गेले. हिवरखेड पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या तक्रारीवरून मोतीराम रतन टिळे (रा. नांद्री ता. खामगाव) याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.