सहावी प्रसुती होती… २५ वर्षांची विवाहिताही दगावली अन्‌ बाळही जगले नाही!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या २५ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोनाली रवी जाधव (२५,रा. पाडळी ता. बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. प्रसुतीवेदना होत असल्याने सोनालीला आज, २२ जुलै रोजी सकाळी साडेदहाला जिल्हा रुग्णालयात भरती केले होते. दुपारी बाराच्या सुमारास तिचा मृत्यू झाला व बाळही दगावले. सोनालीला चार …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या २५ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोनाली रवी जाधव (२५,रा. पाडळी ता. बुलडाणा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

प्रसुतीवेदना होत असल्याने सोनालीला आज, २२ जुलै रोजी सकाळी साडेदहाला जिल्हा रुग्णालयात भरती केले होते. दुपारी बाराच्‍या सुमारास तिचा मृत्यू झाला व बाळही दगावले. सोनालीला चार मुली व एक मुलगा आहे. याप्रकरणी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातच मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.