साईनाथ अग्रवाल यांच्या हार्डवेअरच्या गोडाऊन परिसरात भीषण आग; अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे टळले करोडोंचे नुकसान

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा- चिखली रोडवरील साईनाथ अग्रवाल यांच्या हार्डवेअर गोडाऊन परिसरात आज, 8 एप्रिलला दुपारी 1 च्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामक दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे करोडो रुपयांचे नुकसान टळल्याची प्रतिक्रिया गोडाऊनचे मालक साईनाथ अग्रवाल यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली. गोडाऊनच्या कपाउंडमध्ये आग शिरल्याची माहिती …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा- चिखली रोडवरील साईनाथ अग्रवाल यांच्या हार्डवेअर गोडाऊन परिसरात आज, 8 एप्रिलला दुपारी 1 च्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशामक दल वेळीच घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे करोडो रुपयांचे नुकसान टळल्याची प्रतिक्रिया गोडाऊनचे मालक साईनाथ अग्रवाल यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना दिली.

गोडाऊनच्या कपाउंडमध्ये आग शिरल्याची माहिती अग्रवाल यांना कळताच त्‍यांनी त्वरित अग्निशामक दलाला कळवले. फोनवरून माहिती दिल्यावर 10 मिनिटांच्या आत अग्निशामक दलाचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्रवाल यांनी यावेळी काही खासगी पाण्याच्या टॅंकरला सुद्धा पाचारण केले होते. अग्निशामक दलाने लवकरच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मुख्य गोडाऊनला आग लागली नाही. आग शॉटसर्किट किंवा दुसऱ्या नैसर्गिक कारणाने लागली नसून कुणीतरी घातपात घडवण्याच्या उद्देशाने आग लावली असल्याचा संशय साईनाथ अग्रवाल यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना व्यक्त केला. याप्रकरणी वृत्त लिहिस्तोवर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.